
Ayush Mhatre MI VS CSK : आयुष म्हात्रेने आज चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. सीएसकेसाठी खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडू या विक्रमाची नोंद आयुषच्या नावावर झाली आहे. काल राजस्थानकडून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पदार्पणाच्या सामन्यात शानदार खेळी केली. आजच्या मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यामध्ये आयुष म्हात्रे तुफान फटकेबाजी करताना दिसला.
चेन्नई सुपर किंग्सने १७ वर्षीय आयुष म्हात्रेला राहुल त्रिपाठीच्या जागी प्लेईंग ११ मध्ये संधी दिली. खराब फॉर्ममुळे त्रिपाठीला वगळण्यात आले. मिळालेल्या संधीचे सोने करत आयुषने २१३ च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या फटकेबाजीवर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खुश झाला. चौथ्या ओव्हरमध्ये ४,६,६ अशा प्रकारे आयुषने अश्वनी कुमारची धुलाई केली.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगला आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईचे शेख रशीद आणि रचिन रवींद्र हे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. रचिन रवींद्र ५ धावांवर बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रे फलंदाजीसाठी गेला.
आयुष म्हात्रेने आतापर्यंत मुंबईसाठी ९ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. १६ डावात त्याने दोनदा शतकीय आणि एकदा अर्धशतकीय खेळी करत ५०४ धावा केल्या. लिस्ट ए प्रकारात त्याने ७ सामन्यांमध्ये २ शतकांसह ४५६ धावा केल्या. लिस्ट क्रिकेटमध्ये कमी वयात १५० वैयक्तिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
हार्दिक पंड्या (कर्णधार), रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.