Top Moments In IPL 2024: रिषभ पंतचं कमबॅक ते दिनेश कार्तिकचा गुडबाय! हे आहेत IPL 2024 स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स

Top 5 Moments In IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला पराभूत करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Top Moments In IPL 2024: रिषभ पंतचं कमबॅक ते दिनेश कार्तिकचा गुडबाय! हे आहेत IPL 2024  स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स
KKR vs SRH IPL 2024 Final top 5 moments saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ७४ सामन्यांनंतर आयपीएल २०२४ स्पर्धेचा निकाल लागला आहे. कोलकाताने हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान जाणून घ्या या स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स

रिषभ पंतचं कमबॅक

भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. यामुळे तो काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धेतून त्याने कमबॅक केलं. त्याने या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व केलं. त्याच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १३ सामन्यांमध्ये ४४६ धावा केल्या.

Top Moments In IPL 2024: रिषभ पंतचं कमबॅक ते दिनेश कार्तिकचा गुडबाय! हे आहेत IPL 2024  स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स
KKR vs KKR, IPL Final 2024: फायनलमध्ये हैदराबादचा डाव गडगडला! KKR ला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्लेऑफमध्ये प्रवेश

फाफ डू प्लेसिसचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात या संघाने शानदार कमबॅक केलं. लागोपाठ ६ सामने जिंकून या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलं. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा होता. मात्र या संघाने चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागेल. दरम्यान एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Top Moments In IPL 2024: रिषभ पंतचं कमबॅक ते दिनेश कार्तिकचा गुडबाय! हे आहेत IPL 2024  स्पर्धेतील टॉप ५ मुमेंट्स
KKR vs SRH, IPL 2024: IPL फायनलमध्ये हैदराबादचा संघ रचणार इतिहास! याआधी केवळ मुंबईने केलाय असा रेकॉर्ड

रोहित शर्माचं कर्णधारपद

आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. गेली १० वर्ष संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकलं. त्याच्याऐवजी ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली. मात्र त्यांचा हा निर्णय चुकला. कारण हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाशी राहिला.

एमएस धोनीने सोडलं कर्णधारपद

एकीकडे रोहित शर्माला काढून टाकण्यात आलं. तर दुसरीकडे स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवसाआधीच एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटोशूट झालं त्यावेळी एमएस धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड आला होता. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी राहिला.

दिनेश कार्तिकची निवृत्ती

आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात मोठा मुमेंट म्हणजे दिनेश कर्तिकची निवृत्ती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध पार पडला. एलिमिनेटरच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर त्याने आपल्या १७ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com