KKR vs KKR, IPL Final 2024: फायनलमध्ये हैदराबादचा डाव गडगडला! KKR ला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज

KKR vs SRH IPL 2024 Final Live Updates: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात हैदराबादने फायनलमध्ये सर्वात कमी धावसंख्या उभारली आहे.
KKR vs KKR, IPL Final 2024: फायनलमध्ये हैदराबादचा डाव गडगडला! KKR ला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज
KKR vs SRH IPL 2024 Final twitter

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या डावात ज्या दगडावर हात ठेवला त्याचं सोनं झालं. सनरायझर्स हैदराबाद संघाला या सामन्यात अवघ्या ११३ धावा करता आल्या आहेत. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ स्पर्धेची फायनल जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माची दांडी गुल करत सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का दिला. त्यानंतर वैभव अरोराने ट्रेविस हेडला शून्यावर माघारी धाडलं. सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी प्लेऑफच्या सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे.

KKR vs KKR, IPL Final 2024: फायनलमध्ये हैदराबादचा डाव गडगडला! KKR ला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज
IPL 2024 च्या Closing Ceremony मध्ये अमेरिकन बँडचा धुरळा; सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी होणार खास माहोल

सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर राहुल त्रिपाठी ९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी १३ धावा करत माघारी परतला. एडेन मार्करमने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा डाव २० धावांवर आटोपला. हेनरिक क्लासेन १६ तर शाहबाज अहमद ८ धावा करत तंबूत परतला.

KKR vs KKR, IPL Final 2024: फायनलमध्ये हैदराबादचा डाव गडगडला! KKR ला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज
KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स-

सुनील नरेन, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क

केकेआर इम्पॅक्ट प्लेअर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद-

ट्रॅव्हिस हेड, भिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार)

इम्पॅक्ट प्लेअर्स -अब्दुल समद, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com