KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?

SRH Road To Final In IPL 2024: सनरायझर्स हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दरम्यान कसा राहिलाय प्रवास जाणून घ्या.
KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?
KKR vs SRH IPL 2024 Final saam tv
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या, सनरायझर्स हैदराबाद संघातील आतापर्यंतचा प्रवास.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रवास सांगताना प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील डायलॉग ' हार के जीतने वाले को बजिगर कहते है.' चा नक्की उल्लेख करावासा वाटतो. सुरुवात वाईट झाली मात्र या संघाने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्याच सामन्यात या संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला हरवून पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स -

सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्स -

सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दमदार कमबॅक करत ३१ धावांनी विजय मिळवला होता.

KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?
IPL 2024 Final, KKR vs SRH: अब की बार KKR ? की SRH मारणार बाजी? वाचा कोण कोणावर पडणार भारी

चेन्नई सुपर किंग्ज -

पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

पंजाब किंग्ज -

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाबला धूळ चारत दमदार कमबॅक केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने २५ धावांनी विजय मिळवला होता.

KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?
IPL 2024 च्या Closing Ceremony मध्ये अमेरिकन बँडचा धुरळा; सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी होणार खास माहोल

दिल्ली कॅपिटल्स -

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३५ व्या सामन्यात हैदराबाद आणि दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ६७ धावांनी विजय मिळवला होता.

स्पर्धेतील ४१ व्या सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७८ धावांनी पराभव केला.

स्पर्धेतील ५० व्या सामन्यात हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्स संघासोबत झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर १ धावेने विजय मिळवला.

मुंबईच्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात हैदराबादला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?
KKR, Road To IPL 2024 Final: केकेआर ऑन टॉप! कसा राहिलाय IPL 2024 स्पर्धेतील प्रवास?

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने १० गडी राखून शानदार विजय मिळवला.

गुजरात टायटन्सविरुद्ध झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने ४ गडी राखून विजय मिळवला.

फायनलमध्ये प्रवेश

हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. क्वालिफायर १ च्या सामन्यात या संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर क्वालिफायर २ सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com