MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Match Highlights: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव
mi vs lsg match highlights lucknow super giants beat mumbai indians by 18 runs amd2000twitter

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात आणि शेवटही पराभवानेच केला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्व सामने समाप्त झाले आहेत. मुंबईचा संघ १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

तर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ १४ पैकी ७ सामने जिंकून सहाव्या स्थानी आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून या हंगामाची सुरुवात केली होती. या हंगामातही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केएल राहुलने ५५ धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने चौफेर फटकेबाजी करत ७५ धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने २८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २१४ धावांवर पोहचवली.

MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ३८ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली. तर शेवटी नमन धीरने २८ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटचा सामना मुंबईला १८ धावांनी गमवावा लागला आहे.

MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव
RCB vs CSK सामन्यावर ऑरेंज अलर्टचं संकट! सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com