KKR, Road To IPL 2024 Final: केकेआर ऑन टॉप! कसा राहिलाय IPL 2024 स्पर्धेतील प्रवास?

KKR vs SRH, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता. दरम्यान जाणून घ्या कसा राहिलाया या संघाचा या हंगामातील प्रवास.
KKR, Road To IPL 2024 Final: केकेआर ऑन टॉप! कसा राहिलाय IPL 2024 स्पर्धेतील प्रवास?
Kolkata knight riders road to final saam tv news
Published On

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं. दरम्यान कसा राहिला कोलकाता नाईट रायडर्सचा या हंगामातील प्रवास? जाणून घ्या.

कोलकाता नाईट रायडर्सचा विजयरथ चेन्नई सुपर किंग्ज संघाने रोखला होता. सलग ३ सामने जिंकल्यानंतर या संघाला चेन्नईच्या होम ग्राऊंडवर ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला होता.

KKR, Road To IPL 2024 Final: केकेआर ऑन टॉप! कसा राहिलाय IPL 2024 स्पर्धेतील प्रवास?
IPL 2024 Final, KKR vs SRH: अब की बार KKR ? की SRH मारणार बाजी? वाचा कोण कोणावर पडणार भारी

चेन्नईविरुद्धचा पराभव विसरून कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना लखनऊला ८ गडी राखून धूळ चारली.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. मात्र या संघाला पावसामुळे २ सामने खेळता आले नाही. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार होता. मात्र हा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला.

KKR, Road To IPL 2024 Final: केकेआर ऑन टॉप! कसा राहिलाय IPL 2024 स्पर्धेतील प्रवास?
IPL 2024, KKR vs SRH: KKR चं टेन्शन वाढणार! फायनलसाठी SRH च्या प्लेइंग ११ मध्ये विस्फोटक खेळाडूची एन्ट्री

फायनलमध्ये प्रवेश

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सर्वाधिक गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर क्वालिफायरचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघामध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने एकतर्फी विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलचा सामनात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघामंध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com