KKR vs SRH, IPL 2024: विजय KKR चा मात्र किंग खानकडून CSK,CSK चा जयघोष; फायनलनंतर चेन्नईत काय घडलं? - Video
csk csk chants from shahrukh khantwitter

KKR vs SRH, IPL 2024: विजय KKR चा मात्र किंग खानकडून CSK,CSK चा जयघोष; फायनलनंतर चेन्नईत काय घडलं? - Video

Shahrukh Khan CSK CSK Chants: कोलकाता नाईट रायडर्स संघाने हैदराहबादला पराभूत करत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. मात्र अखेरच्या सामन्यात बाजी कोलकाता नाईट रायडर्स संघाने मारली. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून जिंकला. यासह तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर संघमालक शाहरुख खानचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने मैदानात येऊन खेळाडूंचं कौतुक केलं. खेळाडूंना मिठी मारली. त्यानतंर खेळाडूंच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा मालक असून शाहरुख खान सीएसके,सीएसकेच्या घोषणा देताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

KKR vs SRH, IPL 2024: विजय KKR चा मात्र किंग खानकडून CSK,CSK चा जयघोष; फायनलनंतर चेन्नईत काय घडलं? - Video
KKR vs SRH, IPL 2024 Final: दारुण पराभवानंतर पॅट कमिन्स भावुक! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

कोलकाता नाईट रायडर्सने यापू्र्वी २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. आता सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत कोलकाताने तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. शाहरुख खान, गौरी खान, अबराम खान आणि मुलगी सुहाना खान चाहत्यांचे आभार मानताना दिसून आले. हा सामना चेन्नईमध्ये होता. मात्र चेन्नईचा संघ फायनलमध्ये नव्हता. तरीदेखील चेन्नईचे चाहते हा सामना पाहण्यासाठी आले होते. या चाहत्यांना पाहताच शाहरुख खान सीएसके, सीएसकेच्या घोषणा देताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

KKR vs SRH, IPL 2024: विजय KKR चा मात्र किंग खानकडून CSK,CSK चा जयघोष; फायनलनंतर चेन्नईत काय घडलं? - Video
IPL 2024 Prize Money: विराटला ऑरेंज तर हर्षल पटेलला पर्पल कॅप; पाहा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची संपूर्ण यादी

या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. दबदबा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने १०.३ षटकात आव्हान पूर्ण करत विजयाचा गुलाल उधळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com