KKR vs DC,Playing XI: KKR संघात होणार २ मोठे बदल! पृथ्वीला संधी मिळणार का? पाहा कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

KKR vs DC, Playing 11 Prediction: आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
KKR vs DC Playing XI prediction kolkata knight riders vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000
KKR vs DC Playing XI prediction kolkata knight riders vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000twitter

गेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामने जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कमबॅक केलं आहे. एकवेळ गुणतालिकेत सर्वात शेवटी असणारा हा संघ प्लेऑफमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दिल्लीचा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला गेल्या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्लीची प्लेइंग ११ बदलणार?

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून जॅक फ्रेजर मॅकगर्क सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. २२ वर्षीय या युवा फलंदाजाने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये २३७.५० च्या स्ट्राईक रेटने २४७ धावा केल्या आहेत. यासह ट्रिस्टन स्टब्स देखील चांगली कामगिरी करतोय. यासह अभिषेक पॉरेल, शाई होप आणि रिषभ पंतसारखे फलंदाज कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजंच्या अडचणीत वाढ करु शकतात. या सामन्यात दिल्लीच्या संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

KKR vs DC Playing XI prediction kolkata knight riders vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्लेइंग ११ मध्ये होणार बदल?

कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज मिचेल स्टार्कला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी दु्श्मंता चमीराला संघात स्थान दिले जाऊ शकते. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजाचा फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

KKR vs DC Playing XI prediction kolkata knight riders vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

फिल साल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वैभव अरोडा, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

इम्पॅक्ट प्लेअर: सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, रमनदीप सिंग, रहमानुल्लाह गुरबाज

दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाई होप,रिषभ पंत (यष्टीरक्षक/ कर्णधार ), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिजाद विलियम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेअर- रसिख दार सलाम, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com