MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

MS Dhoni Record In IPL : हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर एमएस धोनीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
MS dhoni created big record in ipl becomes the only players to win 150 matches in ipl amd2000
MS dhoni created big record in ipl becomes the only players to win 150 matches in ipl amd2000twitter

चेन्नई सुपर किंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला आहे. हा चेन्नईचा या हंगामातील पाचवा विजय ठरला आहे. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईने आतापर्यंत १० सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत. दरम्यान हा विजय अतिशय खास ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने या सामन्यात इतिहास रचला आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. हा रेकॉर्ड धोनी व्यतिरिक्त कुठल्याच खेळाडूला करता आलेला नाही. एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेत १५० सामने जिंकणारा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कुठल्याच खेळाडूला असा कारनामा करता आलेला नाही.

MS dhoni created big record in ipl becomes the only players to win 150 matches in ipl amd2000
Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

एमएस धोनी २००८ पासून आयपीएल स्पर्धा खेळतोय. आतापर्यंत त्याने एकूण २५९ सामने खेळले आहेत. यादरम्यान तो १५० वेळेस विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. तर त्याच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३९.५३ च्या सरासरीने ५१७८ धावा केल्या आहेत. ज्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यासह कर्णधार म्हणूनही तो सुपरहिट ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे.

MS dhoni created big record in ipl becomes the only players to win 150 matches in ipl amd2000
GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

चेन्नईचा विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटक अखेर २१२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला १३४ धावा करता आल्या. हा सामना चेन्नईने ७८ धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com