MS Dhoni: सावधान! १० मिनिटात... धोनीची मैदानात एन्ट्री अन् क्विंटन डी कॉकच्या पत्नीला गेला अलर्ट मेसेज; नेमकं काय घडलं?

CSK Vs LSG MS Dhoni Batting: धोनीची मैदानावर एन्ट्री होताना प्रेक्षकांनी असा गोंधळ केला की थेट स्मार्ट वॉचवर अलर्ट मेसेज येऊ लागले. याबाबत क्विंटन डी कॉकच्या पत्नीने केलेल्या खास पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
CSK Vs LSG MS Dhoni Batting:
CSK Vs LSG MS Dhoni Batting: Saamtv

काल लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना झाला. या सामन्यात लखनौने चेन्नईवर मात करत ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला. चेन्नईचा पराभव झाला तरी महेंद्रसिंग धोनीच्या तुफानी खेळीने सर्वांचेच मन जिंकले. यावेळी धोनीची मैदानावर एन्ट्री होताना प्रेक्षकांनी असा गोंधळ केला की थेट स्मार्ट वॉचवर अलर्ट मेसेज येऊ लागले. याबाबत  क्विंटन डी कॉकच्या पत्नीने केलेल्या खास पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

मैदानात काय घडलं?

क्रिकेटमध्ये सध्या आयपीएलचा (IPL 2024) रणसंग्राम सुरू आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती 'चेन्नईचा सुपर किंग' महेंद्रसिंग धोनीची. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात धोनीचा जलवा पाहायला मिळतोय. धोनीची मैदानावर एन्ट्री होताच प्रेक्षक टाळ्या, शिटट्या, आरोळ्यांनी मैदान अक्षरश: डोक्यावर घेत आहेत. हेच चित्र कालच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले.

सामन्यात महेंद्रसिंग धोनी (MahendraSingh Dhoni) फलंदाजीसाठी बाहेर आल्यानंतर संपूर्ण मैदानात धोनीच्या नावाच्या घोषणा होऊ लागल्या. यावेळी मैदानावर गोंधळ इतका होता की स्मार्ट वॉचवरही अलर्टचे मेसेज येऊ लागले. याबाबत लखनौचा खेळाडू क्विंटन डी कॉकच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्या स्मार्ट वॉचवर एक अलर्ट मेसेज आल्याचे तिने म्हटले आहे.

CSK Vs LSG MS Dhoni Batting:
CSK vs LSG : लखनौचा चेन्नईवर ८ गडी राखून दणदणीत विजय; के. एल. राहुल, डी कॉकची धमाकेदार अर्धशतकं

या मेसेजमध्ये मैदानात एवढा गोंगाट आहे की जर कोणी येथे 10 मिनिटे सतत थांबले तर तो बहिरे होऊ शकत, असा धोक्याचा इशारा देण्यात आल्याचे दिसत आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, कालच्या सामन्यात धोनीने पुन्हा स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या ९ चेंडूत २८ धावा कुटल्या.

CSK Vs LSG MS Dhoni Batting:
KL Rahul ला संघात तर स्थान मिळेल, पण प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण; हे आहे कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com