Jasprit Bumrah : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बुमराह बाहेर; कुणाला मिळणार संधी?

Jasprit Bumrah ruled out of Sri Lanka Test series : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याला पूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jasprit Bumrah, India vs Sri Lanka
Jasprit Bumrah, India vs Sri LankaSaam TV Marathi
Published On

Jasprit Bumrah, India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर (Ruled Out) झाला आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने कोणतीही घाई न करता त्याला पूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराह याची संघात निवड करण्यात आली होती. पण विश्वचषकात जसप्रीत तंदुरूस्त आणि फ्रेश राहावा, त्यामुळे त्याला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या भारतीय संघासाठी कोणत्याही मालिकेपेक्षा जसप्रीत बुमराहची पूर्ण फिटनेस सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. आगामी २०२७ चा व्हॉल्ड कप (2027 World Cup) हेच भारतीय संघाचे मुख्य ध्येय आहे. २०२७ मधील महाकुंभासाठी बुमराह पूर्णपणे फिट राहावा याच दृष्टीने बोर्डाने त्याच्या पुनरागमनाबाबत अत्यंत खबरदारीचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण TOI ने खात्रीलायक सूत्रांच्या माहितीच्या आधारावर जसप्रीत बुमराह याला आराम देण्यात आल्याचे वृत्त प्रसारित केले आहे.

Jasprit Bumrah, India vs Sri Lanka
Ration Card : फोनमध्ये ५ मिनिटांत डाऊनलोड करा रेशन कार्ड, सोप्या शब्दात जाणून घ्या पद्धत

काही दिवसापूर्वी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम काही सामन्यावळी जसप्रीतला गुडघ्याचा त्रास पुन्हा बळावल्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. ३२ वर्षीय बुमराहला गेल्या महिन्यात ठरल्याप्रमाणे इंजेक्शन देण्यात आले, परंतु पूर्णपणे बरे होण्यासाठी सुरुवातीला अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीसाठी त्याला तयार ठेवण्याबाबत चर्चा झाली, परंतु शिक्षण परिषदेचे वैद्यकीय पथक कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

Jasprit Bumrah, India vs Sri Lanka
RERA Act : नवीन फ्लॅट घेताय? थांबा! आधी RERA मधील 'हे' नियम वाचा, नाहीतर होऊ शकते मोठी फसवणूक

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात बुमराहचा समावेश करण्यात आला होता. पण आता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करावी लागेल. अकिब नबी या शर्यतीत आघाडीवर आहे, कारण त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीपूर्वी संघासोबत सराव केला होता. गेल्या महिन्यात भारत 'अ' संघासोबत श्रीलंकेचा दौराही केला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या २९ वर्षीय खेळाडूने, दोन सामन्यांमध्ये सहा बळी घेतले. श्रीलंकेला जाणाऱ्या भारतीय गोलंदाजी विभागात सध्या मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.

Jasprit Bumrah, India vs Sri Lanka
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

भारत विरुद्ध श्रीलंका सराव सामन्याचे वेळापत्रक बदलले

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी खेळवल्या जाणाऱ्या सराव सामन्याच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे. आधी चार दिवसांचा असणारा हा सराव सामना आता तीन दिवसांचाच खेळवला जाणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रवासाचा थकवा (Jet Lag) जाणवू नये, तसेच पहिल्या कसोटी सामन्याआधी त्यांना पुरेशी विश्रांती आणि सरावासाठी योग्य वेळ मिळावा, या उद्देशाने संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे खेळाडूंना विश्रांतीसोबतच मालिकेच्या तयारीसाठी योग्य नियोजन करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com