Digital Ration Card UMANG Latest news : सरकारी कामांसाठी अथवा रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. पण अनेकदा रेशन कार्ड फाटणे, हरवणे किंवा वेळेवर न मिळणे यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. पण आता याचं टेन्शन घेऊ नका.
कारण, आता सरकारने रेशन कार्डचा डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तु्म्ही मोबाईल फोनवरून अवघ्या काही मिनिटांत 'डिजिटल रेशन कार्ड' (Digital Ration Card) डाऊनलोड करू शकता. त्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. (How to download Digital Ration Card using DigiLocker)
केंद्र सरकारच्या 'डिजीलॉकर' (DigiLocker) अथवा 'उमंग' (UMANG) या अधिकृत ॲप्सचा वापर करून हे डिजिटल रेशन कार्ड फक्त ५ मिनिटात डाऊनलोड करता येते. या डिजिटल कार्डला फिजिकल (कागदी) रेशन कार्डप्रमाणेच सर्व सरकारी योजना आणि रेशन दुकानांवर कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे आता कागदी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज उरलेली नाही.
त्यामुळेच आपण डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.. याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कोणत्याही क्षणी डिजिलट रेशन कार्ड फक्त ५ मिनिटात डाऊनलोड करू शकता. जवळ रेशन कार्ड नाही, म्हणून आता कोणतेही काम अडणार नाही. पाहूयात याची नेमकी प्रोसेस आहे तरी काय?
DigiLocker वरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे?
तुमच्या फोनमध्ये DigiLocker ॲप डाऊनलोड करा.. त्यानंतर लॉग इन करा.
अॅपच्या सर्च बॉक्समध्ये रेशन कार्ड शोधा.
आता तुमच्या राज्याच्या अन्न विभागाचा पर्याय निवडा.
त्यानंतर, रेशन कार्ड क्रमांक आणि जिल्हा यासारखी आवश्यक माहिती भरा.
तपशिलांची पडताळणी झाल्यावर तुमच्या डिजीलॉकर खात्याच्या 'जारी केलेले दस्तऐवज' (Issued Documents) विभागात दिसेल.
येथून तुम्ही ते PDF म्हणून डाउनलोड किंवा शेअर करू शकता.
उमंग ॲपवरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे?
उमंग ॲपद्वारे रेशन कार्ड डाउनलोड करणे देखील खूप सोपे आहे.
सर्वप्रथम ॲपमध्ये लॉग इन करा.
त्यानंतर, सर्चमध्ये रेशन कार्ड किंवा तुमच्या राज्याच्या अन्न विभागाचे नाव लिहा.
संबंधित सेवा सुरू झाल्यावर रेशनकार्ड क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा.
माहिती बरोबर असल्यास तुमच्या रेशन कार्डची डिजिटल प्रत स्क्रीनवर दिसेल.
ते सहजपणे डाउनलोड करून फोनवर सेव्ह करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.