ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची वादळी खेळी; टीम इंडियाने नामिबियाला धूळ चारली, सुपर-8 मध्ये मिळवलं स्थान
टी२० वर्ल्डकप 2026 नामीबियाच्या विरोधात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अमेरिका आणि नामिबियाला पराभूत केल्याने टीम इंडियाने सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं आहे. भारतासाठी ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने चांगली खेळी खेळली आहे. ईशानने २४ चेंडूत ६१ धावा केल्या. तर पंड्याने २८ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवने नाणेफेक गमावला. त्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं. संजू सॅमसन आणि ईशान किशनने सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजी केली. संजू सॅमसनने ३ षटकार आणि १ चौकार लगावत सुरुवात केली. त्यानंतर २२ धावसंख्या करत संजू बाद झाला. संजूनंतर ईशानने वादळी खेळी खेळली. त्याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने २४ चेंडूत ६१ धावा केल्या. तिलक वर्माने २५ धावा केल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादव फारशी कमाल करू शकला नाही. त्याने १३ चेंडूत १२ धावा केल्या. हार्दिक पंड्याने चांगली फलंदाजी केली. त्याने २७ चेंडूत अर्धशतकी खेळी खेळली. हार्दिकने ५२ धावा कुटल्या.
टीम इंडियाची मधली फळी ढेपाळली. रिंकू सिंहने केवळ १ धावसंख्या केली. अक्षर पटेल पहिल्या चेंडूवर बाद झाला. शिवम दुबेने २३ धावा कुटल्या. परंतु त्यानेही फारशी कमाल केली नाही. नामीबियाचा कर्णधार गेरहार्ड एरसममने ४ गडी बाद केले.
टीम इंडियाचा गोलंदाज वरुण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली. वरुणने १२ चेंडूत ७ धावा देऊन ३ गडी बाद केले. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ गडी बाद केले. या विजयामुळे टीम इंडिया स्पर्धेत सुपर ८ मध्ये पोहोचली. तर ग्रुप ए मध्ये टॉपवर पोहोचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

