

मुंबई महापालिका निवडणुकीआधी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना करणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर पहिली ठिणगी पडलीय ती चंद्रपूरमध्ये ठाकरेसेनेनं भाजपला पाठिंबा देण्यावरुन.... चंद्रपूरमध्ये भाजपनं ठाकरेसेनेच्या नगरसेवकांना 1 -1 कोटी दिल्याचा आरोप केला... आणि त्यावरुन वादाची ठिणगी पडलीय... तर ठाकरेसेनेनंही आरोप सिद्ध कऱण्याचं आव्हान दिलंय..
खरंतर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर बनणं शक्य होतं.. मात्र ठाकरेसेनेनं भाजपला पाठिंबा देत उपमहापौरपद पदरात पाडून घेतलं... आणि सत्तेच्या या तडजोडीवरुन काँग्रेस आणि ठाकरेसेनेत जुंपली..
दुसरीकडे मनसे डोंबिवलीत शिंदेसेनेसोबत गेल्यानं ठाकरे सेनेनं थयथयाट केला होता.. तोच धागा पकडून मनसे नेते राजू पाटील यांनी तुमचं ते चंद्रपूर आणि आमची ती डोंबिवली, असं ट्वीट करुन ठाकरेसेनेला डिवचलंय...
मात्र चंद्रपूरमध्ये ठाकरेसेनेनं काँग्रेसचं गणित कसं बिघडवलं...पाहूयात.....
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस आणि आघाडीचे 30, बसपा 1 असे 31 नगरसेवकांचं काँग्रेसला समर्थन मिळालं... मात्र राज्यात महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेसेनेच्या 6 आणि वंचितच्या 1 नगरसेवकानं भाजपला पाठिंबा दिला... एवढंच नाही तर शिंदेसेनेच्या 1 आणि अपक्षाचं संख्याबळ जुळवून भाजपनं महापौरपद पटकावलं... मात्र यामध्ये वंचितचा 1 आणि एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले..
मराठीचा मुद्दा, महापालिकेची निवडणूक यासाठी एकत्र आलेल्या ठाकरेंमध्ये महापालिका निवडणुकीनंतर सत्तेच्या वाटमारीवरुन ठिणगी पडायला सुरुवात झालीय... त्यामुळे आगामी काळात छोट्या घटनांमधून ठाकरे बंधूंमधील दरी वाढत जाणार का? आणि एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी ही घोषणा शेवटपर्यंत जपली जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.