

परभणीच्या जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात
गंगाखेडचे ४ तरुण ठार,
एक गंभीर जखमी
विशाल शिंदे, साम टीव्ही
राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांनी प्राण गमावले आहेत. परभणीतही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भीषण अपघातात चौघांच्या मृत्यूने परभणीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर ही दुर्घटना घडली. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात रोहन संजय राठोड (वय 25, रा. गंगाखेड), कृष्णा बालाजी गुट्टे (वय 25, रा. गंगाखेड),बालाजी आश्रोबा आवटे (वय 27, रा. गंगाखेड),बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय 27, रा. गंगाखेड) आदींचा मृत्यू झाला. या अपघातात गोपाळ गणेश रोकडे (वय २५, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोपाळला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळतात रस्त्यावर एकच गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडी सुरळीत केली. अपघातात तरुण भाविकांच्या मृत्यूने परभणीकर हळहळ व्यक्त करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.