

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा सक्रिय झालीये
मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप
माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा केल्याने खळबळ
पंढरपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी सक्रिय झाले आहेत. 'मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'आपल्याच काही लोकांना माझा विरोधात काय काय वदवून घेतले जात आहे. माझ्यासोबत मायबाप जनता आहे. त्यामुळे मला काही होणार नाही. सरकारने आरक्षण नाही दिले, तर एका एकाला घोडेच लावतो, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा बैठकांचा सपाटा लावण्यास सज्ज झाले आहेत. सातारा संस्थान,मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहे. पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेतली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सरकारने त्याआधी पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणार असे त्यांनी सांगितले आहे. मी बैठकीला सुरुवात करणार आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये 15 लाख नोंदी आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार असल्यातेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करावी - मनोज जरांगे
'अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी जर कुटुंबाची असेल तर चौकशी केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. या घटनेनंतर मात्र मराठा समाजाने सावध राहिले पाहिजे. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत आंदोलन उभा करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.