

सीएसकेचा दमदार विजय
मुंबई इंडियन्सची खराब फलंदाजी
दुसऱ्यांदा पराभवाची हॅट्रिक
आयपीएल २०२६ चा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघातील बहुतेक खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले. नमंधिर आणि रायन रिकेल्टन वगळता कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही, त्यामुळे मुंबई संघ केवळ १५९ धावाच करू शकली. अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी सीएसकेसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. दोघांनीही मुंबईच्या फलंदाजांना दबावात ठेवलं. सीएसकेने हा सामना ८ गडी राखून सहज जिंकला.
मुंबईनं दिलेल्या आव्हनाचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवातही चांगली झाली नाही. संजू सॅमसनने ९ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या. त्याने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. संजू या सामन्यात अपयशी ठरला. ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूंमध्ये नाबाद ६७ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. कार्तिक शर्मानेही ४० चेंडूंत ५४ धावांचे योगदान दिले. सीएसकेने १८.१ षटकांत दोन गडी गमावून १६८ धावा करत सामना जिंकला.
पहिल्या डावात मुंबई इंडियन्सने सलामीवीर विल जॅक्स अवघ्या ५ चेंडूंत १ धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टनने डाव सावरला. त्याने २४ चेंडूंत ३७ धावा केल्या. नूर अहमदने रिकल्टनला बाद केलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नमंधिरने चार चौकार आणि तीन षटकारांसह ३७ चेंडूंमध्ये ५७ धावा ठोकल्या.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव १२ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. मोठी खेळी करण्यात तोही अपयशी ठरला. सीएसकेसाठी गोलंदाजी करताना अंशुल कंबोजने ४ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले. सर्वाधिक बळी घेतले, तर नूर अहमदने ४ षटकांत २६ धावा देऊन २ बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.