IPL 2023 Prize Money: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंवरही झाला पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम

IPL 2023 Cash Prize: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला.
CSK
CSK Twitter

CSK vs GT IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. दरम्यान शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने चौकार मारला आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. यासह चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

CSK
IPL 2023 Winner: गुजरातला नमवत थालाची CSK ठरली IPL चॅम्पियन! पाचवे जेतेपद मिळवत केली मुंबईची बरोबरी

कुणाला किती रक्कम मिळाली?

विजेता संघ : चेन्नई सुपर किंग्ज

२० कोटी रुपये

उपविजेता संघ : गुजरात टायटन्स

१२.५ कोटी रुपये

तिसऱ्या क्रमांकावरील संघ -मुंबई इंडियन्स - ७ कोटी रुपये

चौथ्या क्रमांकावरील संघ - लखनऊ सुपर जायंट्स - ६.५ कोटी रुपये

पर्पल कॅप विजेता खेळाडू - मोहम्मद शमी , १० लाख रुपये

ऑरेंज कॅप विजेता खेळाडू - शुभमन गिल, १० लाख रुपये

सुपर स्ट्रायकर - ग्लेन मॅक्सवेल, १० लाख रुपये

मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर -शुभमन गिल,१० लाख रुपये

गेम चेंजर - शुभमन गिल,१० लाख रुपये

एमर्जिंग प्लेअर - यशस्वी जयस्वाल, १० लाख रुपये

कॅच ऑफ द सिरीज -राशिद खान, १० लाख रुपये

अंतिम सामन्यातील सामनावीर - डेवोन कॉन्व्हे, ५ लाख रुपये. (Latest sports updates)

CSK
CSK vs GT,IPL Final 2023: ..तर तिकीट असूनही मिळणार नाही फायनल सामन्यात एन्ट्री

चेन्नईचा जोरदार विजय

चेन्नई सुपर किंग्ज संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने २६ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने ४७, शिवम दुबेने ३२ धावांची खेळी केली. शेवटी अजिंक्य रहाणेने २७, अंबाती रायडूने १९ आणि रवींद्र जडेजाने नाबाद १५ धावांची खेळी करत संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com