

आयपीएल 2027 मध्ये 94 सामने होणार का
बीसीसीआयने आयपीएल वेळापत्रकात काय बदल केला
देवजीत सैकिया यांचं आयपीएलवर मोठं विधान
जगातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच (BCCI) आयपीएलच्या वेळापत्रकात (Schedule) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सामन्यांची संख्या वाढणार का याबाबत माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये ७४ सामन्यांऐवजी ९४ सामने होतील अशी चर्चा आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, सामन्यांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नाही. आधीप्रमाणेच ७४ सामने खेळवले जातील. परदेशी खेळाडूंचे वेळापत्रकामुळे सामन्यांची संख्या वाढणार नाही. कारण परदेशी खेळाडूंची द्विपक्षीय मालिकांची प्रतिबद्धता असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये आयपीएलसाठी दोन महिन्यांचा वेळ काढणे देखील खूप कठीण होईल.
अशा परिस्थितीत २० अतिरिक्त सामने जोडणे व्यावहारिक नसल्याचंही सैकिया म्हणाले. आयपीएल जगभरातील क्रिकेटपटूंचा प्लॅटफॉर्म असल्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांतील खेळाडूंची उपलब्धताही महत्त्वाची असते. त्यामुळे सध्या ७४ सामन्यांची स्पर्धा खेळवली जाईल.
पुढील हंगामात ही स्पर्धा साधारणपणे दोन आठवडे आधी सुरू होऊ शकते. २०२६ ची आयपीएल स्पर्धा २८ मार्च ते ३१ मे या कालावधीत झाली होती. मात्र, उष्णता आणि मान्सूनपूर्व कालावधी लक्षात घेता आगामी हंगाम लवकर सुरू करण्याबाबत विचार केला जात असल्याचं बीसीसीआयच्या सचिव म्हणालेत. यावर्षी आयपीएलची सुरुवात २८ मार्चला झाली होती, तर अंतिम सामना हा ३१ मे रोजी खेळवण्यात आला होता.
टूर्नामेंटच्या काळात १५ मेनंतर पूर्व मान्सूनचे दिवस असतात, त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता असते. मे महिन्याच्या उत्तरार्धात अनेक शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू होतो. यामुळे प्ले-ऑफ आणि फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यांवर संटक घोंघावत असते. टूर्नामेंटचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पावसाने बाधित व्हावा असं बीसीसीआयला वाटत नाही. म्हणूनच बीसीसीआयने आपल्या 'गेम्स डेव्हलपमेंट' विभागाला नवीन विंडोवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान आयपीएल लवकर सुरू करण्याच्या या योजनेचा थेट परिणाम भारताच्या देशांतर्गत (Domestic) क्रिकेट हंगामावर होण्याची शक्यता आहे. रणजी ट्रॉफीसह सर्व प्रमुख देशांतर्गत स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यामुळे खेळाडूंना आयपीएलच्या तयारीसाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.