SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals: आयपीएल २०२६ च्या ३१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २४२ धावांचा डोंगर उभा करून दिल्ली कॅपिटल्सला अडचणीत आणले.
SRH VS DC IPL 2026: ABHISHEK SHARMA’S 135 POWERS HYDERABAD WIN
SRH VS DC IPL 2026: ABHISHEK SHARMA’S 135 POWERS HYDERABAD WIN
Published On

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर अभिषेक शर्माच्या वादळात दिल्लीच्या संघ नेस्तनाबूद झाला. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादचा मोठा विजय मिळाला. आयपीएल २०२६ च्या ३१ व्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा ४७ धावांनी एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत २४२ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला केवळ १९५ धावाच करता आल्या.

SRH VS DC IPL 2026: ABHISHEK SHARMA’S 135 POWERS HYDERABAD WIN
Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

हैदराबादच्या विजयाचा हिरो अभिषेक शर्मा ठरला. त्याने ६८ चेंडूंमध्ये नाबाद राहत १३५ धावा केल्या. अभिषेक व्यतिरिक्त, ट्रॅव्हिस हेडने ३७ आणि इशान किशनने २५ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने १३ चेंडूंमध्ये नाबाद ३७ धावांचं योगदान दिलं.

अभिषेक शर्माचे वादळ

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने हैदराबादमध्ये नाणेफेक जिंकली, पण त्याने आधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाला फलंदाजांचे आमंत्रण दिलं. याचा फायदा घेत हैदराबादची सलामीवीर जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज सुरुवात केली. अभिषेक शर्माने पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली.

SRH VS DC IPL 2026: ABHISHEK SHARMA’S 135 POWERS HYDERABAD WIN
GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

हैदराबादने पॉवरप्लेमध्ये ६७ धावा केल्या आणि अवघ्या २५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच ट्रॅव्हिस हेड बाद झाला, पण अभिषेकने फटकेबाजी चालूच ठेवली. त्याने कर्णधार इशान किशनसोबत मिळून ३५ चेंडूंमध्ये ७९ धावांची भागीदारी केली. अभिषेकने दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने नितीश राणाच्या गोलंदाजीवर पाच षटकार ठोकले. तसेच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले.

अभिषेकने आपल्या खेळीत १० षटकार आणि १० चौकार ठोकले आणि शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत तो नाबाद राहिला. दरम्यान क्लासेननेही तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३७ धावा करत धडाकेबाज खेळी केली.

दिल्लीची फलंदाजी अपयशी

दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पथुम निस्संका ८ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी एक मजबूत भागीदारी रचली. नितीश राणाने ३० चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. केएल राहुलनेही २३ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. मात्र, या खेळाडूंची फलंदाजी दिल्लीला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. हैदराबादकडून एहसान मलिंगाने चार, तर हर्ष दुबेने तीन बळी घेतले. शकिब हुसेन आणि मधुशंकाने प्रत्येकी एक बळी घेतला.

Points Table मध्ये मोठा बदल

हैदराबादच्या विजयामुळे आणि दिल्लीच्या पराभवामुळे पॉईट्स टेबल मध्ये लक्षणीय बदल झाला आहे. हैदराबाद आता सात सामन्यांत चार विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर घसरला आहे. पंजाब पहिल्या, तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com