IPL Points Table : गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ, RCB-पंजाबला जोरदार धक्का, वाचा कोण कोणत्या क्रमांकावर?

IPL Playoff Qualification Scenario : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७७ धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. या विजयामुळे RCB आणि पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला आहे.
Gujarat Titans IPL win
Shubman Gill celebrates Gujarat Titans’ dominant victory over Rajasthan Royals in IPL 2026.Gujarat Titans
Published On

IPL 2026 updated points table after GT win : शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७७ धावांनी पराभव करत प्लेऑफकडे वाटचाल केली. राजस्थानच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. गुजरातने राजस्थानटा पराभव करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातच्या विजयाचा ३ संघाना मोठा फटका बसलाय. राजस्थान, पंजाब आणि आरसीबी या तिन्ही संघ गुणतालिकेतील क्रमवारीत घसरलेत. नेमकं काय बदल झाला? गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांकावर गेलेय? याबाबत जाणून घेऊयात...

गुजरातकडून पराभव झाल्यानंतर राजस्थानचा संघ गुणतालिकेत घसरला आहेच. त्याशिवाय पंजाब आणि आरसीबी या संघालाही फटका बसला आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघही गुणतालिकेत प्रत्येकी एका स्थानाने खाली घसरले आहेत. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. पण गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. हैदराबाद आणि गुजरात यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत. पण चांगल्या नेट रन रेटमुळे हैदराबाद पहिल्या, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे.

Gujarat Titans IPL win
हायहोल्टेज ड्रामा! अखेर संख्याबळाचा घोळ सुटला, थलपतीचाच 'विजय'; आज शपथविधी

राजस्थानविरोधातील सामन्यापीर्वी गुजरातचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. तर राजस्थान चौथ्या स्थानावर विराजमान होता. पण शनिवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवत गुजरातने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पंजाबचा संघ तिसऱ्या, आरसीबी चौथ्या आणि राजस्थान पाचव्या क्रमांकावर पोहचलाय. राजस्थान रॉयल्सचा मागील सात सामन्यात पाचवा पराभव झालाय तर गुजरातने आपले मागील चारही सामने जिंकले आहेत. मुंबई, लखनौ आणि दिल्ली हे संघ तळाला आहेत, तर चेन्नई आणि कोलकात्याच्या प्लेऑफच्या आशा अद्याप जिवंत आहेत.

पाहा गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या क्रमांकावर?

IPL Points Table
IPL Points TableIPL Points Table

कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि रशीद खान यांच्या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७७ धावांनी पराभूत केले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल राजस्थानचा संघ १५२ धावांपर्यंतच पोहचू शकला. राजस्थानविरोधात मोठा विजय मिळवल्यामुळे गुजरातचा नेटरनरेट चांगला झालाय. ११ सामन्यात गुजरातचे १४ गुण झाले असून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Gujarat Titans IPL win
पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com