RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

RCB vs GT IPL 2026 Final : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने गतविजेत्या आरसीबीसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले. या विजेतेपदाच्या लढतीत वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.
RCB vs GT IPL 2026 Final :
RCB vs GT IPL 2026 Final
Published On

कागिसो रबाडाने पर्पल कॅप जिंकली

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅप जिंकली

विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

आयपीएल २०२६मध्ये आरसीबीनं धमाकेदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सनं दिलेलं १५६ धावांचे आव्हान आरसीबीने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत पार केलं. अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी हवी त्याच पद्धतीने फटकेबाजी करत विराट कोहलीनं आपल्या संघाला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिलं.

आरसीबीला विजयासाठी फक्त हव्यात ७ धावा

आरसीबीला विजयासाठी फक्त ७ धावांची गरज आहे. विराट कोहली ६५ धावांवर नाबाद आहे.

RCB vs GT Final Live Score: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू धावसंख्या १२६-४

डावाच्या १३ षटकांच्या अखेरीस, आरसीबीच्या धावसंख्येत ४ गडी बाद १२६ धावा झाल्या आहेत. विजेतेपद पटकावण्यासाठी बेंगळुरूला आता ४२ चेंडूंमध्ये केवळ ३० धावांची गरज आहे. विराट कोहलीने ३० चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावा केल्या. टिम डेव्हिडने १३ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या आहेत.

RCB vs GT Final Live Score:  अंतिम सामन्यात विराट कोहलीची तुफान फटकेबाजी, २५ चेंडूत ठोकलं अर्धशतक

आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत २५ चेंडूत ५० धावा केल्या. २०० च्या स्ट्राइक रेटनं ५० धावा केल्या.

RCB vs GT Final Live Score:  रशीदने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दिले दोन धक्के

आरसीबीसाठी रशीद खानने नवव्या षटकात दोन बळी घेतले. रजत पाटीदार १३ चेंडूंमध्ये १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्या केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

RCB vs GT Final Live Score:  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गमावली दुसरी विकेट  

सिराजच्या पाठोपाठ कागिसो रबाडाने आरसीबीला दुसरा धक्का दिला. देवदत्त पडिक्कल चार चेंडूंमध्ये एक धाव काढून बाद झाला.

आरसीबीनं ६२ धावांवर गमावली पहिली विकेट, व्यंकटेश अय्यर बनला सिराजचा शिकार

आरसीबीनं आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. अवघ्या तीन षटकात ५० धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या ६२ असताना विजयासाठी ९४ चेंडू ९४ धावांची गरज होती, त्याचवेळी मोहम्मद सिराजनं व्यंकटेश अय्यरला बाद केलं. धावसंख्या ६२ असताना, पाचव्या षटकात आरसीबीने आपली पहिली विकेट गमावली. व्यंकटेश अय्यर १६ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.

विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यरकडून आक्रमक फलंदाजी, आरसीबीचं अर्धशतक

RCBच्या डावाला सुरुवात,विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यरकडून आक्रमक फलंदाजी

१५५ धावांचा बचाव करताना, गुजरात टायटन्सचा संघ मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात सर्वबाद झाला. केवळ पाच धावा झाल्या. व्यंकटेश अय्यर पाच चेंडूंमध्ये चार धावांवर होता. विराट कोहलीचे खाते अजून उघडले नव्हते. त्याने लेग बायवर एक धाव घेतली.

RCB vs GT IPL 2026 Final :  गुजरात टायटन्सचा डाव संपला, ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबीला १५६ धावांची गरज

आयपीएल २०२६ चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होत असून यात आरसीबीचा वर्चस्व पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ८ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या तीन षटता सलामीवीर तंबूत परतले.

गुजरातला ११५ वर सहावा धक्का, राहुल तेवातिया ७ धावांवर बाद

पंधरा षटकानंतर गुजरातच्या १०५ धावा,५ गडी बाद

१५ षटकांच्या अखेरीस गुजरात टायटन्सच्या धावसंख्येवर ५ गडी बाद १०५ धावा झाल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरने २१ चेंडूंत दोन चौकारांसह २३ धावा केल्या आहेत. राहुल तेवतियाने दोन चेंडूंत दोन धावा केल्या आहेत. गुजरात संघ धावसंख्या १७० पर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल.

RCB vs GT Final Live Score: गुजरातला पाचवा धक्का, अरशद खान १५ धावांवर झेलबाद;

गुजरात टायटन्सच्या अर्शद खानने पाच चेंडूंमध्ये दोन षटकार ठोकले. त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु हेजलवुडनं त्याला बाद केलं. अरशद खानने डफीच्या षटकात एकूण १६ धावा ठोकल्या होत्या.

RCB vs GT Final Live Score: जोश बटलर १९ धावांवर बाद, ७३ धावांवर गुजरातनं गमावला ४ गडी

गुजरात टायटन्सने १३ व्या षटकात ७३ धावांवर आपली चौथी विकेट गमावली. जोस बटलर २३ चेंडूंमध्ये १९ धावांवर बाद झाला. त्याला कृणाल पांड्याने बाद केले.

गुजरातची फलंदाजी ढेपाळली, ५५ धावांवर ३ बाद

आरसीबीचा गोलंदाज रसिखनं गुजरातला तिसरा धक्का दिला. त्याने सिंधूची विकेट घेतली.

सात षटकानंतर गुजरातच्या संघाचं अर्धशतक पूर्ण

कृणाल पांड्याने आपल्या सातव्या षटकात केवळ पाच धावा दिल्या. सात षटकांच्या अखेरीस गुजरात टायटन्सच्या धावसंख्येवर दोन गडी बाद ५० धावा झाल्या आहेत. निशांत सिंधूने १४ चेंडूंत तीन चौकारांसह १७ धावा केल्या आहेत. जोस बटलरने आठ चेंडूंत एका चौकारासह आठ धावा केल्या आहेत.

RCB vs GT Final Live Score:  सहा षटकानंतर गुजरातच्या ४५ धावा, दोन गडी बाद

गुजरातनं २६ धावांवर २ विकेट गमावले, दोन्ही सलामीवीर तंबूत परतले

भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शनला झेलबाद केलं. जितेश शर्माने त्याचा झेल घेतला. त्यावेळी संघाची धावसंख्या २६ होती. तर सुदर्शन १२ धावांवर होता. सुदर्शननं १२ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या. अंतिम सामन्यात गुजरातचा संघ अडचणीत सापडलेला दिसत आहे.

RCB vs GT Final Live Score: गुजरातला पहिला धक्का, कर्णधार शुबमन गिल झेलबाद

गुजरात टायटन्सने तिसऱ्या षटकात आपली पहिली विकेट गमावली. कर्णधार शुभमन गिल आठ चेंडूंमध्ये १० धावा करून बाद झाला. रजत पाटीदारने जोश हेझलवूडचा एक अप्रतिम झेल घेतला. गुजरातने २२ धावांवर आपली पहिली विकेट गमावली.

RCB vs GT Final Live Score: पहिल्या षटकात घेतला रिव्ह्यू

गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनला पंचांनी पहिल्याच षटकात बाद दिले होते, परंतु रिव्ह्यू घेतल्यानंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले.

RCB vs GT IPL 2026 Final :पहिल्या षटकात गुजरातची संथ सुरुवात, १३ धावा,  जेकब डफीने टाकलं पहिलं षटक

पहिल्या षटकात गुजरातनं ११ धावा केल्या. साई सुदर्शन ९ धावा केल्या आहेत. शुबमन गिलने एक धाव केली.

पहिला षटकात आरसीबीच्या गोलंदाजाने ३ व्हाइड चेंडू टाकले.

RCB vs GT Final Live Updates:गुजरात टायटन्सचा प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज

RCB vs GT Final Live Score: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कप्तान), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जैकब डफी, जोश हेजलवुड और रसिख सलाम डार

RCB vs GT Final Live Score: RCB नं जिंकली नाणेफेक, गुजरातला फलंदाजीचं आमंत्रण

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार रजत पाटीदारने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकली. पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करेल. आरसीबी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर गुजरातने एक बदल केला आहे.

बेंगळूरु आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी वैभव सूर्यवंशी अहमदाबादमध्ये दाखल

Summary

आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी वैभव सुर्यवंशी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे.

IPL 2026 Finale : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील या महासंग्रामापूर्वी हवामानामुळे चिंता वाढली आहे. हवामान विभागाने अहमदाबादमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

IPL 2026 Final: अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सची दमदार कामगिरी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने आतापर्यंत एकूण ३० सामने खेळले आहेत, त्यापैकी १८ सामने जिंकले आहेत. २०२६ च्या आयपीएल हंगामात अहमदाबादमधील त्यांच्या कामगिरीनुसार, त्यांनी सातपैकी पाच सामने जिंकले आहेत.

RCB vs GT IPL 2026 Final: RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रविवार, ३१ मे २०२६ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. विजेतेपदाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. अंतिम सामन्याचे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल

RCB vs GT IPL 2026 Final: अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलने रचला मोठा विक्रम

कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत गुजरात टायटन्सकडून ७५ सामने खेळले आहेत. या काळात त्याने गुजरातसाठी सर्वाधिक ३४ झेल घेतले आहेत. धावा रोखण्यातही गिल खूप यशस्वी ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com