किंग कोहली विरुद्ध प्रिन्स गिल! IPL च्या दुसऱ्या ट्रॉफीसाठी गुजरात आणि RCB सज्ज; पाहा कोणाचे पारडे जड?

RCB vs GT head to head : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 ची महाफायनल रंगणार आहे. विराट कोहली विरुद्ध शुभमन गिल या महासंग्रामात कोणाचे पारडे जड आहे, संभाव्य प्लेइंग 11 आणि सामन्याचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या.
IPL Final RCB vs GT
IPL Final RCB vs GTSaam TV marathi
Published On

IPL Final 2026, RCB vs GT, Virat Kohli, Shubman Gill : टी २० क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल आता अंतिम टप्प्यात आली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात महाफायनलचा थरार रंगणार आहे. शुभमन गिलचे नेतृत्व आणि रजत पाटीदारचा फॉर्मात असलेला बॅटचा तडाखा, याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. फॉर्मात असलेल्या गोलंदाजीच्या जोरावर गुजरात दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे, फॉर्मात असलेला किंग कोहली आणि आरसीबीचा संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारी ही लढत फक्त दोन संघांमधली नाही, तर ती 'किंग' विराट कोहली विरुद्ध 'प्रिन्स' शुभमन गिल यांच्यातील महासंग्रामाची आहे. दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या आयपीएल ट्रॉफीसाठी जीवाचे रान करायला तयार असल्याने आज क्रिकेटचा थरार सर्वोच्च पातळीवर पोहोचणार आहे. पाहा या महाफायनलमध्ये कोणाचे पारडे जड आहे आणि कोण मारणार बाजी...

IPL Final RCB vs GT
IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघानी एक काळ गाजवला होता, तसचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आरसीबी मैदानात उतरणार आहे. आरसीबीचा संघ समतोल दिसतेय.. फलंदाजीत विराट कोहली, वेंकटेश अय्यर, रजत पाटीदार, देवदत्त पड्डीकल यांचा फॉर्म जोरात आहे, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूडच्या जोडीला कृणाल आणि रसीख सलाम दार यांच्या गोलंदाजीची धार असेल. आरसीबीकडून टीम डेव्हिड, जितेश आणि शेफर्ड फिनिशिंग टच देण्यास सक्षम आहे. प्रत्युत्तर गुजरातची फलंदाजी आघाडीच्या ३ फलंदाजांवरच अवलंबून आहे. कर्णधार गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्या खांद्यावर गुजरातच्या फलंदाजीचे ओझं असेल. तर गोलंदाजीत रडाबा, सिराज आणि होल्डर यांची धार कायम आहे. त्यांच्या जोडीला राशिद खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा अनुभव असेल. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही.

फलंदाजीत कुणाच्या किती धावा?

गुजरात -

  • शुभमन गिल - १५ सामने - ७२२ धावा

  • साई सुदर्शन - १६ सामने - ७१० धावा

  • जोस बटलर - १६ सामने - ५०७ धावा

  • वॉशिंगटन सुंदर - १६ सामने ३२७ धावा

  • राहुल तेवातिया - १५ सामने - १८३ धावा

आरसीबी -

  • विराट कोहली - १५ सामने - ६०० धावा

  • रजत पाटीदार - १४ सामने ४८६ धावा

  • देवदत्त पडीक्कल - १५ सामने - ४६३ धावा

  • टीम डेव्हिड - १५ सामने - २८१ धावा

  • कृणाल पांड्या - १५ सामने २२५ धावा

गोलंदाजीत आघाडीवर कोण?

गुजरात -

  • कगिसो रबाडा - १६ सामने २८ विकेट

  • राशिद खान - १६ सामने - १९ विकेट

  • मोहम्मद सिराज - १६ सामने १८ विकेट

  • जेसन होल्डर - १० सामने १७ विकेट

  • प्रसिद्ध कृष्णा - ११ सामने १६ विकेट

आरसीबी -

  • भुवनेश्वर कुमार - १५ सामने - २६ विकेट

  • रसिक दार - ११ सामने १६ विकेट

  • कृणाल पांड्या - १५ सामने १३ विकेट

  • जोस हेजलवूड - १२ सामने १३ विकेट

  • सुयश शर्मा - १२ सामने ९ विकेट

  • जेकब डफी - ५ सामने ९ विकेट

IPL Final RCB vs GT
RCB vs GT Final : पावसामुळं फायनल रद्द झाली तर कोण ठरणार IPL विजेता, जाणून घ्या नियम

RCB संभाव्य प्लेइंग 11 :

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पंड्या, टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, जेकब डफी, रसिक सलाम दार

इम्पॅक्ट प्लेअर : रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, जॉर्डन कॉक्स

GT संभाव्य प्लेइंग 11:

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, निशांत सिंधू, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

इम्पॅक्ट प्लेअर : राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, कुमार कुशाग्रा, साई किशोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com