IPL 2025: कोण रिटेन,कोण रिलीज? आज निकाल लागणार; IPL रिटेंशन कुठे पाहता येणार लाईव्ह?

IPL Retention 2025: आयपीएल रिटेंशन आज लाईव्ह पाहता येणार आहे. दरम्यान केव्हा, कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या.
IPL 2025: कोण रिटेन,कोण रिलीज? आज निकाल लागणार; IPL रिटेंशन कुठे पाहता येणार लाईव्ह?
ipl retentionyandex
Published On

IPL 2025 Retention And Live Streaming Details: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं डन केली आहेत. आज ही नावं जाहीर करायची शेवटची तारीख असणार आहे.

आगामी हंगामात केएल राहुल, रिषभ पंत आणि रोहित शर्मासारखे स्टार खेळाडू आपल्या संघात कायम राहणार का? हे जाणून घेण्यासाठी फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान हा कार्यक्रम कुठे आणि केव्हा लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या.

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली. त्यामुळे नाराज झालेला रोहित मुंबईची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे. तर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला टाटा बायबाय करून ऑक्शनमध्ये येणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

IPL 2025: कोण रिटेन,कोण रिलीज? आज निकाल लागणार; IPL रिटेंशन कुठे पाहता येणार लाईव्ह?
IND vs NZ 3rd Test: विराट ते रोहित... हे 4 भारतीय खेळाडू मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळणार

यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे फ्रेंचायझी या खेळाडूंबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2025: कोण रिटेन,कोण रिलीज? आज निकाल लागणार; IPL रिटेंशन कुठे पाहता येणार लाईव्ह?
IND W vs NZ W: न्यूझीलंडला टीम इंडियाचा दणका! शानदार विजयासह मालिकेवर केला कब्जा

रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं देण्याची शेवटची तारीख कधी?

आज ( ३१ ऑक्टोबर) रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं देण्याची शेवटची तारीख असणार आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

आयपीएल २०२५ स्पर्धेचे रिटेंशन भारतात लाईव्ह पाहता येणार आहे. हे रिटेंशन स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येईल. हे रिटेंशन भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजता सुरु होईल.

आयपीएल रिटेंशनची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

आयपीएल रिटेंशनची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जिओ सिनेमा अॅप आणि जिओ सिनेमाच्या सांकेतिक स्थळावर पाहू शकता.

ऑक्शन पर्सची किंमत वाढवली

आयपीएल २०२५ स्पर्धपूर्वी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पर्सची रक्कम २० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. यावेळी पर्सची रक्कम १२० कोटी रुपये असणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी सर्वांची नजर आयपीएलच्या रिटेंशनवर असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com