Mumbai Indians: मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार! दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा

Mumbai Indians Retain Players: आगामी हंगामात मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार, याबाबत माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.
Mumbai Indians: मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार! दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा
mumbai indianstwitter
Published On

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली. मात्र गेल्या हंगामात मुंबईने टोकाचा निर्णय घेत, रोहितला कर्णधारपदावरुन काढलं आणि ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली.

हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मुंबईचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करु शकतो, याबाबत हरभजन सिंगने भाष्य केलं आहे.

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार! दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा
IPL 2025: RCBचं ठरलं! हे ५ खेळाडू रिटेन अन् या गोलंदाजाला uncapped Player म्हणून घेणार

मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार?

हरभजन सिंगच्या मते, मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार हार्दिक पंड्या, संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारताचा टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला रिटेन करणार.

यासह रोहित शर्माला देखील रिटेन करणार. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो. मात्र हरभजन सिंगच्या मते असं काहीच होणार नाहीये. यासह तिलक वर्माला मुंबई हातून जाऊ देणार नाही आणि नेहाल वढेराला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले जाऊ शकते, असं हरभजन सिंगचं म्हणणं आहे.

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार! दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा
IPL 2025: केएल राहुलची LSG मधून सुट्टी? या 3 खेळाडूंना रिटेन करणार

काय म्हणाला हरभजन सिंग?

हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, 'मुंबई इंडियन्सला गेल्या २-३ हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. एमआयचा संघ एक मजबूत संघ आहे. जितकं मला माहितीये, ते आता नक्कीच भविष्याचा प्लान तयार करत असतील. याचा अर्थ असा मुळीच नाही, की ते अनुभवी खेळाडूंची साथ सोडणार. गेल्या हंगामात त्यांनी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. निश्चितच त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवलं जाईल. यासह जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना देखील रिटेन केलं जाईल. '

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार! दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा
IND vs NZ 3rd Test: मुंबईत धावांचा पाऊस पडणार की विकेट्सची रांग लागणार? कशी असेल खेळपट्टी?

रोहितला रिटेन करणार का?

रोहित बाबत बोलताना तो म्हणाला की, 'रोहितच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकप जिंकला आहे, त्यामुळे मला तरी वाटतं की, मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन करायला हवं. त्याला रिटेन केलं, तर ४ खेळाडू होतील. त्यामुळे पाचवा खेळाडू म्हणून तिलक वर्माला रिटेन केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com