Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टन्सीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Harbhajan Singh On Hardik Pandya Captaincy: काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. दरम्यान हार्दिक पंड्याचं कर्णधारपद गेल्यामुळे हरभजन सिंग भडकला आहे.
Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टन्सीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला
harbhajan singhtwitter
Published On

Harbhajan Singh News In Marathi: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

रोहितने निवृत्ती घेतल्यामुळे कर्णधारपदाची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे कर्णधारपदाची जागा रिकामी झाली होती. या पदासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला.

आता भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने या निर्णयावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. रोहित संघाचा कर्णधार असताना, हार्दिक पंड्याकडे संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे हार्दिक पंड्या या पदासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र असं काहीच झालं नाही. ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली.

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टन्सीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला
IND vs BAN: बांगलादेशची खैर नाय! टी-20 मालिकेत टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू एकटा नडणार

काय म्हणाला हरभजन सिंग?

एका चर्चेदरम्यान बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, 'मी आश्चर्यचकीत झालो होतो, मी नाराज झालो. तो उप-कर्णधार होता. जेव्हा कर्णधार कर्णधारपद सोडतो, तेव्हा उप-कर्णधार कर्णधार बनतो. पण तुम्ही जर फिटनेसच्या आधारावर बोलत असाल, तर टी-२० क्रिकेट वर्षभर होत नसतं.'

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टन्सीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला
IND vs BAN: पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली? सूर्या या खेळाडूंना देणार संधी

तसेच तो पुढे म्हणाला की, 'कर्णधारपद गेल्यानंतर हार्दिक पंड्याला मोठा धक्का बसला असेल. टी-२० वर्ल्डकप जिंकून आले आणि त्यानंतर असं काही झालं. हा त्याच्यासाठी मोठा धक्का असेल. पण हे चूकीचं आहे. मी सूर्यकुमार यादवचा आदर करतो. तो शानदार खेळाडू आहे आणि निस्वार्थ होऊन खेळतो.

सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. ६ ऑक्टोबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतही सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com