रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक आहे? Harbhajan Singh ने विषयच संपवला

Harbhajan Singh On MS Dhoni And Rohit Sharma Captaincy: रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या नेतृत्वात काय फरक आहे. हरभजन सिंगने याबाबत वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा आणि  एमएस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक आहे? Harbhajan Singh ने विषयच संपवला
harbhajan singhyandex
Published On

एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज कर्णधार आहे. दोघांच्या नावापुढं वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराचा टॅग लागला आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या मते दोघांच्याही कॅप्टन्सी स्टाइलमध्ये खूप फरक आहे.

हरभजन सिंगला एमएस धोनी आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव आहे. दरम्यान हरभजन सिंगने दोघांमधला फरक समजावून सांगितला आहे.

रोहित शर्मा आणि  एमएस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक आहे? Harbhajan Singh ने विषयच संपवला
Team India : आगामी सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे जखमी

हरभजन सिंगने तरुवर कोहलीच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला की, ' धोनी आणि रोहित दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे लीडर आहे. एमएस धोनी कधीच क्षेत्ररक्षकाच्या जवळ जाऊन, तुला कोणती फिल्डींग हवी आहे?असं विचारणार नाही. तो तुम्हाला चुकांमधून शिकण्याची संधी देतो.' मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हरभजन सिंगला चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात स्थान दिलं होतं.

रोहित शर्मा आणि  एमएस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक आहे? Harbhajan Singh ने विषयच संपवला
Yograj Singh: मी MS Dhoni ला कधीच माफ करणार नाही, त्यानं आरशात तोंड पाहावं! युवराज सिंगच्या वडिलांची जहरी टीका

रोहितबद्दल बोलताना काय म्हणाला हरभजन सिंग?

रोहित शर्माबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, ' रोहितचं जरा वेगळं आहे. तो प्रत्येक खेळाडूसोबत जाऊन चर्चा करतो. तो असा खेळाडू आहे, जो प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर जाऊन त्याला समजावून सांगतो. तो तुमच्या आत्मविश्वासात भर घालतो, तुम्हाला पटवून देतो की, तुम्ही हे करु शकता.'

रोहित शर्मा आणि  एमएस धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये काय फरक आहे? Harbhajan Singh ने विषयच संपवला
Hong Kong T20 Cricket: टी-20 सामन्याचा निकाल अवघ्या 10 चेंडूत लागला , ICC च्या स्पर्धेत घडला विक्रम!

तसेच तो पुढे म्हणाला की,' रोहितच्या नेतृत्वात फरक तेव्हा जाणवला जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करायला सुरुवात केली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. टी-२० क्रिकेटमध्ये अशा खूप गोष्टी घडतात, ज्या आपण लगेच विसरुन जातो. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये आपण असं करु शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्व काही कर्णधाराच्या हातात असतं.'

मला स्टीव्ह वॉ आठवतो, कारण तो एक उत्तम कर्णधार होता. जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असाल, तर वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्येही नेतृत्व करणं सोपं होऊन जातं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com