KKR Retention: काय सांगता! श्रेयस अय्यर- आंद्रे रसेल KKR सोडणार? या 4 खेळाडूंना रिटेन करणार

Kolkata Knight Riders IPL 2025 Retain Players: आगामी हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघ कोणत्या ४ खेळाडूंना रिटेन करणार जाणून घ्या.
KKR Retention: काय सांगता! श्रेयस अय्यर- आंद्रे रसेल KKR सोडणार? या 4 खेळाडूंना रिटेन करणार
csk vs kkr ipl 2024 kolkata knight riders won the toss elected to bowl twitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्व संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत.

गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र आगामी हंगामापूर्वी अशी चर्चा सुरु आहे की, श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाची साथ सोडू शकतो. यासह स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला देखील रिलीज केले जाऊ शकते.

KKR Retention: काय सांगता! श्रेयस अय्यर- आंद्रे रसेल KKR सोडणार? या 4 खेळाडूंना रिटेन करणार
IND vs NZ 3rd Test: मुंबईत धावांचा पाऊस पडणार की विकेट्सची रांग लागणार? कशी असेल खेळपट्टी?

रेवस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ४ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा सुरु आहे. ज्यात हर्षित राणा, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांचा समावेश आहे. तर कर्णधार श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेल यांना रिटेन करण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

KKR Retention: काय सांगता! श्रेयस अय्यर- आंद्रे रसेल KKR सोडणार? या 4 खेळाडूंना रिटेन करणार
IND vs NZ 2nd Test: एकटा सँटनर टीम इंडियाला नडला! तब्बल 12 वर्षांनंतर भारताने गमावली कसोटी मालिका

रसेल का सोडणार संघाची साथ?

या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, आंद्रे रसेलने कमी सॅलरीमध्ये रिटेन होण्यास नकार दिला आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्याला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर रिटेन करण्यावर रेड सिग्नल दिला आहे.

त्यामुळे रसेलला जर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायचं असेल, तर त्याला कमी सॅलरीमध्ये रिटेन व्हावं लागेल. रसेल २०१४ पासून या संघासाठी खेळतोय. या संघाला २ वेळेस चॅम्पियन बनवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १२ कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं.

KKR Retention: काय सांगता! श्रेयस अय्यर- आंद्रे रसेल KKR सोडणार? या 4 खेळाडूंना रिटेन करणार
IND vs NZ, 2nd Test: 4331 दिवसांनंतर भारताचा मायदेशात पराभव! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

श्रेयस अय्यर खेळणार का?

श्रेयस अय्यर आगामी हंगामात खेळणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की,कोलकाता नाईट रायडर्सला श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून हवा आहे. मात्र त्याला पहिल्या स्थानी रिटेन केलं जाणार नाही, त्यामुळे श्रेयस अय्यर नाराज आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स कोणाला रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com