IPL 2025 आधी CSK ला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू KKR च्या ताफ्यात

Dwayne Bravo Joins KKR: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघातील दिग्गज खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश केला आहे.
IPL 2025 आधी CSK ला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू KKR च्या ताफ्यात
CSK
Published On

Dwayne Bravo Joins KKR: आयपीएल २०२५ स्पर्धेपुर्वी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपद पटकावलं होतं. मात्र गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होताच, ही कोलकाता नाईट रायडर्स संघाला अनुभवी मार्गदर्शकाची गरज होती. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होची मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे.

ड्वेन ब्राव्होने नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ब्राव्होने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. मात्र आता त्याने केकेआरच्या ताफ्यात प्रवेश केला आहे.

IPL 2025 आधी CSK ला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू KKR च्या ताफ्यात
IND vs BAN : नाणेफीकीचा कौल भारताच्या बाजूने, बांगलादेशच्या संघात दोन बदल, पाहा प्लेईंग ११

काय म्हणाला ड्वेन ब्राव्हो?

आपली नवी इनिंग सुरु करताना ड्वेन ब्राव्हो म्हणाला की, ' मी गेल्या १० वर्षांपासून सीपीएल स्पर्धेत ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मालकांकडून मिळणारी कुटुंबासारखी वागणूक खूप खास आहे.'

ड्वेन ब्राव्हो हा टी- २० क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहे. त्याला आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ५८२ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना ६३१ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना त्याने ६९७० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ वेळेस ४ गडी बाद करण्याचा आणि २ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा करुन दाखवला आहे.

IPL 2025 आधी CSK ला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू KKR च्या ताफ्यात
IND vs BAN: कानपूर कसोटी सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

आयपीएल स्पर्धेत असा राहिलाय रेकॉर्ड

ड्वेन ब्राव्होला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. या संघाकडून त्याला १६१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १५६० धावा केल्या आहेत. दरम्यान नाबाद ७० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com