IPL 2025 Points Table: हैदराबादच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला फटका; मुंबईचा क्रम घसरला

IPL 2025 Points Table: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासोबतच पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल झालेत.
IPL 2025 Points Table
IPL 2025 Points TableSaamtv
Published On

कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात हैदराबादचा दारूण पराभव झाला. आपल्या फलंदाजीने इतर संघाच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आज नांगी टाकली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघ अवघ्या १२० धावांमध्ये ऑलऑऊट झाला.

केकेआरचा या सीझनमधील हा दुसरा विजय आहे. या दुसऱ्या विजयासह कोलकाता संघाने पॉइंट्स टेबलवर भरारी घेतलीय. परंतु हैदराबादच्या पराभवाचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसलाय. या गुणतालिकेत मुंबई संघाचा क्रम घसरलाय.

IPL २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झालाय. कोलकाता नाईट रायडर्सने केलेल्या मोठ्या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय घसरण झालीय. परंतु ८० धावांनी हैदराबादचा पराभव करूनही केकेआरला अजूनही टॉप ४ मध्ये स्थान मिळवता आले नाहीये. दरम्यान आता १० संघांपैकी ५ संघांचे प्रत्येकी ४ पॉइंट्स आहेत, तर ५ संघांचे केवळ दोन पॉइंट्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे सध्या दोन पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सह संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ संघाकडे २ पॉइंट्स असून तो संघ सातव्या तर चेन्नई सुपर किंग्स २ पॉइंट्सह आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबई टॉप ४ मध्ये कसा पोहोचेल?

शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना लखनऊमध्ये खेळला जाईल. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. आता उद्याच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांला चार गुण मिळतील. इतकेच नाही तर मोठा विजय मिळवल्यास संघ टॉप ४ मध्येही आपले स्थान निश्चित करू शकतो. हा सामनाही खूप रंजक असणार आहे.

IPL 2025 Points Table
CSK हारली तरी झालं मुंबई इंडियन्सचं नुकसान; बिघडलं मुंबईचं सारं गणित

सनरायझर्स हैदराबादचा संघ गेला तळाला

राजस्थान रॉयल्सनेदेखील आतापर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे हा संघ ९व्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडे दोन गुण आहेत. तरीही संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. संघाच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता पुनरागमन करण्यासाठी या संघाला नुसता विजय मिळवून चालणार नाही तर त्याला मोठ्या विजयाची गरज असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com