
आयपीएल 2025 च्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 6 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना CSK चा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 176 धावाच करू शकला. चेन्नईच्या संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 63 धावा बनवल्या. तर रविंद्र जडेजा 32 धावा करून नाबाद राहिला.
राजस्थानचा गोलंदाज वानिंदू हसरंगाने भेदक गोलंदाजी करत चेन्नईच्या चार विकेट घेतल्या. आरआर संघाचा फलंदाज नितीश राणाने शानदार खेळी करत 36 चेंडूत 81 धावा केल्या, त्यामुळे राजस्थानचा संघ स्कोअर बोर्डवर 182 धावा लावण्यात यशस्वी ठरला. या सामन्यातील राजस्थानच्या विजयाने पॉइंट टेबलवरील सर्व चित्र बदलले आहे. राजस्थानने चेन्नईला मात दिल्याने मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान झालंय. पॉइंट टेबलमधील मुंबईचं स्थान खाली घसरलंय.
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये पहिल्या विजयाची चव चाखली. मुंबई इंडियन्सला मात्र सीएसकेच्या पराभवाचा तोटा झालाय. या विजयासह राजस्थान पॉइंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर आलाय. तर सीएसकेच्या पराभवामुळे मुंबईच्या संघाची पॉइंट टेबलमध्ये घसरण झालीय. मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलच्या तळाशी आहे. दरम्यान राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स पॉइंट टेबलमध्ये आता सातव्या नंबरवर आलाय. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर पोहोचलाय. लखनौ सुपर जायंट्स 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स चौथ्या स्थानावर आहे.
183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात रचिन रवींद्रला जोफ्रा आर्चरने बाद केलं. तर राहुल त्रिपाठी 19 चेंडूत 23 धावा करून वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. शिवम दुबेही चांगली फलंदाजी करू शकला नाही, तो फक्त 18 धावा करून बाद झाला. विजय शंकरनेही फलंदाजीत अपयशी ठरला. तो फक्त 9 धावा करून बाद झाला. राजस्थानचा गोलंदाज हसरंगाने त्याचा त्रिफळा उडवला. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करत 44 चेंडूत 63 धावांची केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.