New Rule In IPL 2024: गोलंदाजांची चांदीच चांंदी! IPL स्पर्धेसाठी BCCI कडून नवा नियम लागू

IPL New Rule: आयपीएल स्पर्धेचा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
ipl 2024 new rule now bowler can bowl two bouncers in over cricket news in marathi
ipl 2024 new rule now bowler can bowl two bouncers in over cricket news in marathi yandex

IPL 2024 New Rule:

आयपीएल स्पर्धेचा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरवर्षी या स्पर्धेत काहीतरी नवीन असतं. यावेळी स्पर्धेचं १७ वं हंगाम आहे. यावेळीही काहीतरी नवीन आणि हटके पाहायला मिळणार आहे. आगामी हंगामात बीसीसीआयकडून नवा नियम लागू केला जाणार आहे.

ipl 2024 new rule now bowler can bowl two bouncers in over cricket news in marathi
IPL 2024, CSK Squad: सलामीच्या लढतीपूर्वी धोनीचं टेन्शन वाढलं! CSK ला फटका बसणार

काय आहे नवीन नियम?

टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजाला एका षटकात केवळ १ बाऊन्सर चेंडू टाकण्याची अनुमती दिली जाते. तर दुसऱ्यांदा बाऊन्सर टाकल्यास अंपायरकडून अतिरिक्त धाव दिली जाते. मात्र आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलंदाजांना एकाच षटकात २ बाऊन्सर चेंडू टाकण्याची अनुमती दिली जाणार आहे. या नियमामुळे गोलंदाजांची चांदी होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एकूण एक चेंडू हा अतिशय महत्वाचा असतो. गोलंदाज आता २० षटकात ४० बाऊन्सर्सचा वापर करताना दिसून येणार आहे. दरम्यान या नियमामुळे फलंदाजांचं टेन्शन वाढणार आहे. (Cricket news in marathi)

ipl 2024 new rule now bowler can bowl two bouncers in over cricket news in marathi
IPL 2024, RCB Squad: स्टार फलंदाजांची भरमार; मात्र ही एक चूक RCB ला संपूर्ण हंगामात नडणार

बीसीसीआयकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत हा नियम लागू केला होता. त्यानंतर आता आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू केला जाणार आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना केवळ एकच बाऊन्सर चेंडू टाकायची अनुमती आहे. दुसरा बाऊन्सर चेंडू टाकल्यास अंपायरकडून अतिरिक्त धावेचा इशारा केला जातो.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com