IPL 2024, RCB Squad: स्टार फलंदाजांची भरमार; मात्र ही एक चूक RCB ला संपूर्ण हंगामात नडणार

Royal Challengers Bangalore Strenght And Weakness: आयपीएलच्या पहिल्या लढतीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ चेपॉकमध्ये दाखल झाले आहेत. हा सामना २२ मार्च रोजी चेन्नईतील चेपॉकमध्ये रंगणार आहे.
Royal challengers bangalore playing first match on 22 march agianst csk know the team strenghts and weakness
Royal challengers bangalore playing first match on 22 march agianst csk know the team strenghts and weakness yandex

IPL 2024 Royal Challengers Bangalore Strenght And Weakness:

आयपीएलच्या पहिल्या लढतीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ चेपॉकमध्ये दाखल झाले आहेत. हा सामना २२ मार्च रोजी चेन्नईतील चेपॉकमध्ये रंगणार आहे. या रोमांचक सामन्यात एमएस धोनी आणि विराट कोहली अॅक्शनमध्ये असणार आहे. चेन्नईचा संघ सहाव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या काय आहे रॉयल चॅलेंजर्स संघाची मजबूत आणि कमकुवत बाजू.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची मजबूत बाजू..

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळीही संघात स्टार फलंदाजांची भरमार आहे. या संघात कर्णधार फाफ डू प्लेसीसह विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू आहेत. या संघात ६ ते ७ क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. तर गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ आणि आकाशदीपसारखे गोलंदाज आहेत. (Cricket news in marathi)

Royal challengers bangalore playing first match on 22 march agianst csk know the team strenghts and weakness
IPL 2024, CSK Squad: सलामीच्या लढतीपूर्वी धोनीचं टेन्शन वाढलं! CSK ला फटका बसणार

कमकुवत बाजू..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात अनुभवी फलंदाज असले तरीदेखील सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणजे फिरकी गोलंदाज. या संघात कर्ण शर्मासारखा अनुभवी गोलंदाज आहेत. मात्र त्याला सोडलं तर अनुभवी फिरकी गोलंदाज नाही. यावेळी कॅमरन ग्रीन गोलंदाजी करताना दिसेल. मात्र तो फिरकी गोलंदाज नसून मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे.

Royal challengers bangalore playing first match on 22 march agianst csk know the team strenghts and weakness
Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढली! रिप्लेसमेंट म्हणून रबाडाची पलटणमध्ये एन्ट्री

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ:

फाफ डू प्लेसीस, विराट कोहली, गेन मॅक्लवेल, पाटीदार, रावत, कार्तिक, सिराज, ग्रीन, जॅक्स, प्रभुदेसाई, लोमरोर, कर्ण शर्मा, टोप्ली, भंडगे, मयंक डागर, व्यशाख, आकाश दीप, हिमांशु, राजन कुमार, अल्झारी, यश दयाल, टॉम करन, फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com