IPL 2024: धोनी की कोहली? चेपॉकवर कोण कोणावर पडणार भारी; पाहा CSK vs RCB चा हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs RCB Head To Head Record: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ओपनिंगचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
ipl 2024 first match prview  rcb vs csk head to head record match details
ipl 2024 first match prview rcb vs csk head to head record match details Saam tv news

IPL 2024, CSK vs RCB Head To Head Record:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ओपनिंगचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. २२ मार्च रोजी होणारा हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर रंगणार आहे. हा सामना चेन्नई चेन्नईत होत असल्याने नक्कीच चेन्नई सुपर किंग्ज संघाचं पारडं जड असणार आहे. तर दुसरीकडे स्टार खेळाडूंनी सज्ज असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ चेन्नईला कडवी झुंज देताना दिसुन येऊ शकतो.

ipl 2024 first match prview  rcb vs csk head to head record match details
IPL 2024, RCB Squad: स्टार फलंदाजांची भरमार; मात्र ही एक चूक RCB ला संपूर्ण हंगामात नडणार

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने गेल्या हंगामात शानदार कामगिरी केली होती. यासह स्पर्धेतील फायनलमध्ये गुजरातला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र यावेळी चेन्नईला जेतेपद जिंकणं मुळीच सोपं नसणार आहे. कारण संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत.

तर गेल्या हंगामात चेन्नईला फायनल जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा डेवोन कॉनव्हे दुखापतग्रस्त आहे. तसेच त्या त्याच्या कमबॅकबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे ऋतुराज गायकवाडसह रचिन रविंद्र डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

यासह अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांना देखील या संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. शार्दुल ठाकुर दमदार फॉर्ममध्ये असून त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. (Cricket news in marathi)

ipl 2024 first match prview  rcb vs csk head to head record match details
Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढली! रिप्लेसमेंट म्हणून रबाडाची पलटणमध्ये एन्ट्री

सीएसकेविरुद्ध खेळताना कसा राहिलाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा रेकॉर्ड?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. दोन्ही संघ ३१ सामने खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला केवळ १० सामने जिंकता आले आहेत. तर २० सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड़, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोइन अली, रविंद्र जडेजा, मिशेल सेंटनर, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महेश थिक्षाना.

रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु : विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, रीस टॉपले, मोहम्मद सिराज, आकाशदीप.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com