Ruturaj Gaikwad Statement: इथेच सामना फिरला! विजयानंतर ऋतुराजने सांगितला सामन्यातील टर्निंग पॉईंट

CSK vs RCB, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ipl 2024 csk vs rcb ruturaj gaikwad revealed the turning point of the match chennai super kings vs royal challengers bangalore
ipl 2024 csk vs rcb ruturaj gaikwad revealed the turning point of the match chennai super kings vs royal challengers bangalore twitter

Ruturaj Gaikwad Statement, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७४ धावांचं आव्हान होतं या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १९ व्या षटकात आव्हान पूर्ण केलं आणि बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सामना नेमका कुठे फिरला याबाबत वक्तव्य केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ' सुरुवातीचे २-३ षटक सोडले तर आम्ही सामन्यावर नियंत्रण बनवून बनवून ठेवलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही चांगला खेळ पाहायला मिळाला. मात्र त्यांचा संघ १०-१५ धावा मागे राहिला. मला वाटतं की, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिसला बाद करणं आमच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. आम्ही लवकर लवकर ३ फलंदाजांना बाद केलं. हा आमच्यासाठी प्लस पॉईंट होता.'

ipl 2024 csk vs rcb ruturaj gaikwad revealed the turning point of the match chennai super kings vs royal challengers bangalore
Faf Du Plessis Statement: हातचा सामना निसटल्यानंतर फाफ ड्युप्लेसिस या खेळाडूवर भडकला, पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी एन्जॉय करतोय. माझ्यावर अतिरिक्त दबाव येतोय असं मला कधीच जाणवलं नाही. कुठल्या परिस्थितीत काय करायचंय हे मला माहितेय. अजिंक्य रहाणेने सकारात्मक होऊन फलंदाजी केली.सर्वांना आपली जबाबदारी माहितेय. सर्वांना माहितेय की, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध खेळताना धावा करायच्या आहेत. या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. मला असं वाटतं की, टॉप ३ फलंदाजांनी कमीत कमी १५ व्या षटकापर्यंत फलंदाजी करावी. (Cricket news in marathi)

ipl 2024 csk vs rcb ruturaj gaikwad revealed the turning point of the match chennai super kings vs royal challengers bangalore
IPL 2024 Winner Prediction: यंदा हाच संघ उंचावणार IPL ची ट्रॉफी! पहिल्या सामन्यापूर्वीच ब्रेट लीची मोठी भविष्यवाणी

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अनुज रावतने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने ३८ धावा केल्या. या धावांच्या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २० षटकअखेर १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८.४ षटकात आव्हान पूर्ण केलं आणि हा सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com