RR vs DC: यशस्वी जयस्वालची वादळी खेळी! राजस्थानचे दिल्लीपुढे 200 धावांचे आव्हान

राजस्थान रॉयल्सने (RR) दमदार खेळी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या.
DC Vs RR IPL 2023
DC Vs RR IPL 2023Saamtv
Published On: 

Delhi Capitals Vs Rajasthan Royals: आयपीएल (IPL) २०२३ मधील ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जातोय. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने (RR) दमदार खेळी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या.

यशस्वी जायस्वालची जबरदस्त वादळी खेळी आणि जोस बटलरची संयमी फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटी आलेल्या शिमरोन हेटमायरनेही जोरदार फटकेबाजी केली. याच खेळीच्या जोरावर दिल्लीला (Delhi Capitals) विजयासाठी 200 धावांचे आव्हान मिळाले आहे.

DC Vs RR IPL 2023
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; मॅचविनर गोलंदाज संघाबाहेर?

यशस्वी जयस्वालची जबरदस्त धुलाई..

राजस्थानचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने आज आक्रमक सुरुवात केली. जायस्वाल याने 31 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटाकर लगावला. यशस्वी जायस्वाल याने पहिल्याच षटकात पाच चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. यशस्वी जायस्वाल याने धावांचा पाऊस पाडला. जायस्वाल आणि जोस बटलर याने दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई केली.

DC Vs RR IPL 2023
Ajit Pawar News : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका; अजित पवार संतापले, नेमकं काय घडलं?

बटलरनेही झळकावले अर्धशतक...

जोस बटलर याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. जायस्वाल चौकार षटकार मारत असताना बटलर दुसऱ्या टोकाला शांतपणे फलंदाजी करत होता. जोस बटलर याने अखेरच्या काही षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने शिमरोन हेटमायर याला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवली. जोस बटलरने 51 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटकार लगावला.

राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.. पण चार षटकात 36 धावा खर्च केल्या. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने यापूर्वीचा सामना गमावला आहे. अशा स्थितीत आज संघाला विजय मिळवायचा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सनेही पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे दिल्लीलाही विजयाच्या ट्रॅकवर परतायला आवडेल. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com