Ajit Pawar News : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका; अजित पवार संतापले, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Reaction : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका, मी पुण्यातच होतो, तरी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या, असं म्हणत अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam TV
Published On

Ajit Pawar Reaction On Not Reachable News : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका, मी पुण्यातच होतो, तरी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या, असं म्हणत अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. " मला पित्ताचा त्रास होत असल्याने मी बाहेर फिरणं टाळलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन घरीच विश्रांती घेत होतो," असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Radhakrishna Vikhe News : उध्दव ठाकरेंची बौद्धिक दिवाळखोरी निघाली; महसूल मंत्री विखे पाटलांची बोचरी टीका

"माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे," असं अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला. (Breaking Marathi News)

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी सायंकाळपासून नॉट रिचेबल झाले आहेत. ते आपल्या वाहनांचा ताफा आणि स्टाफला सोबत न घेताच खसगी वाहनातून कुठेतरी गेले. अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलं. याशिवाय सोशल मीडियावरही यावर बरीच चर्चा रंगली.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) नॉटरिचेबल असल्याचं वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र अखेर आज (शनिवारी) पुन्हा अजित पवार पुण्यात परतले. त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला देखील हजेरी लावली. दरम्यान, नॉटरिचेबल असल्याच्या प्रश्नावरही अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

Ajit Pawar News
Sujay vikhe-Patil News: सावरकरांच्या मुद्द्यावरून सुजय विखे-पाटील यांचा ठाकरे गटावर निशाणा; म्हणाले....

काय म्हणाले अजित पवार?

"गेल्या काही दिवसांपासून माझे सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

"माध्यमांनी 'नॉट रिचेबल'च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाण्याची सूचना त्यांनी माध्यमांना केली. त्याचबरोबर मला आता पुन्हा पुन्हा नॉटरिचेबल म्हणू नका", असा सललाही त्यांनी पत्रकारांना दिला.

"खोके म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं?"

अजित पवार यांनीही पुण्यातील एका कार्यक्रमात मिश्कील टोलेबाजी केली. रॅपसाँग करणाऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आल्यावरून अजित पवार यांनी टोला लगावला. त्याने कुणाचं नाव घेतलं नव्हतं. आता खोके म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं, असा टोला अजित पवारांनी लगावला. एका रॅप करणाऱ्या मुलाला तुरुंगात डांबलं गेलं. त्याने कुणाचं नाव घेतलं नव्हतं. तो बिचारा गाणं गात होता. त्याने फक्त खोका म्हणलं होतं, असंही अजित पवार म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com