MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; मॅचविनर गोलंदाज संघाबाहेर?

MI vs CSK Match updates : चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
MI vs CSK Match updates
MI vs CSK Match updatesSaam TV
Published On

MI vs CSK, IPL 2023 Match : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला (IPL 2023)  जोमात सुरूवात झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत सर्वच सामन्यांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कोणताही संघ दुबळा दिसत नाहीये. आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा आजच्या सामन्यात खेळण्याची कमी शक्यता आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुब्रमन्यम बद्रीनाथ याने त्याच्या युटूब चॅनलवरून ही माहिती दिली आहे. (Latest sports updates)

MI vs CSK Match updates
Reece Topley's Replacement: रिस टोपली बाहेर तर टी- ट्वेन्टीतील एका रेकॉर्डब्रेकर खेळाडूची RCB च्या ताफ्यात एंट्री

जोफ्रा आर्चरला शुक्रवारी नेटमध्ये सराव करत असताना चेंडू लागला होता. त्यामुळे त्याच्या कोपरला दुखापत झाली. अशा स्थितीत तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची कमी शक्यता आहे, असं बद्रीनाथने आपल्या युटूब चॅनलवर सांगितलं आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध मुंबई  (Mumbai Indians) यांच्यामध्ये सुरूवातीपासूनच काटे की टक्कर बघायला मिळते. चेन्नईविरुद्धचा प्रत्येक सामना मुंबईनेच जिंकावा अशी, क्रिडाप्रेमींची अपेक्षा असते. अशातच जर आर्चर आजच्या सामन्यात खेळला नाही, तर तो संघासाठी मोठा धक्का मानला जाईल, कारण त्याच्याशिवाय इतका अनुभव असलेला दुसरा गोलंदाज नाही.

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा खेळणार नसल्याने आधीच मुंबई इंडियन्सचा संघ काही प्रमाणात बॅकफूटवर गेला आहे. कारण बुमरा असा गोलंदाज आहे, ज्याची जागा इतर कोणताही खेळाडू भरून काढू शकत नाही.

MI vs CSK Match updates
IPL 2023 MI Vs CSK: रोहितची रणनिती भेदणार धोनीचे 'हे' ३ खास खबरी; मुंबईकर खेळाडूचं ठरणार MI साठी डोकेदुखी?

अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला जोफ्रा आर्चरकडून खूपच अपेक्षा आहेत. अशातच जर आर्चरही बाहेर गेला, तर मुंबई पूर्णपणे बॅकफूटवर येईल. संघाकडे फलंदाजीचे भरपूर पर्याय आहेत, पण गोलंदाजीत संघाचा हात यंदाही कमजोर असल्याचे दिसत आहे.

CSK Playing XI : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), दीपक चहर, आरएस हंगरगेकर

MI Probable Playing XI : मुंबई संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ह्रतिक शोकीन, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), जेसन बेहरेनडॉर्फ

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com