

क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे. कर्नाटकाचा माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय यांचं रविवारी एका क्लब सामन्यादरम्यान हार्ट अटॅकने निधन झालं. ते केवळ ३९ वर्षांचे होते. अक्षय बंगळूरुच्या केएससीए थर्ड डिव्हिजन लीगच्या सामन्यात सफायर सीसी संघाकडून खेळत होते. त्यांनी सामन्यादरम्यान चार ओव्हर्स गोलंदाजी केली. पण त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि छातीत दुखू लागलं.
प्रकृती खालावल्यानंतर ते मैदानाबाहेर गेला. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत. अक्षय २०१४-१५ च्या सिझनमध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक टीमचा एक भाग होते. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीने नाव कमावलं होतं.
अक्षयने २०११ ते २०१३ दरम्यान कर्नाटकसाठी सहा प्रथम-श्रेणी सामने, तीन लिस्ट ए सामने आणि नऊ टी२० सामने खेळले. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये अक्षयने १८ विकेट्स घेतले आणि ८९ रन्स केलेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने सहा विकेट्स घेतले आणि ११ रन्स केलेत. टी२० क्रिकेटमध्ये अक्षयने आठ बळी घेतले आणि १० रन्स केलेत.
एस.एल. अक्षय यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडालीये. एस.एल. अक्षय यांची कारकीर्द अल्पकाळ टिकली, पण क्रिकेटबद्दलची त्यांची आवड अढळ राहिली. निवृत्तीनंतरही अक्षय क्रिकेटमध्ये एक्टिव्हपणे सहभागी होत होते. ते कर्नाटकच्या १९ वर्षांखालील टीममसोबत तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देत होते.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने अक्षय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. एका निवेदनात, केएससीएने म्हटलंय की, अक्षयने खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमधून कर्नाटक क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. तरुण क्रिकेटपटूंच्या विकासातील त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहणार आहे. अक्षयच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने कर्नाटक क्रिकेट समुदायावर शोककळा पसरलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.