भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आज ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता पल्लेकलेच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेला धूळ चारली आहे. त्यामुळे २-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ हा सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वी पल्लेकलेतील हवामानाबाबत लेटेस्ट अपडेट समोर आली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील सर्व सामने पल्लेकलेच्या मैदानावर सुरु आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. पावसाने हजेरी लावल्याने हा सामना उशिराने सुरु झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही पावसाने हजेरी लावली होती. या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ १० टक्के इतकी असणार आहे.
आज होणाऱ्या सामन्यातील हवामानाबद्दल बोलायचं झालं, तर वेदर डॉट कॉमने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ १० टक्के इतकी असणार आहे. तर सकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.
भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. गेल्या सामन्यात शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती. तो या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबेचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, खलील अहमद
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.