IND vs SL, Playing 11: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियात ४ बदल निश्चित? अशी असू शकते प्लेइंग ११

Team India Playing XI Prediction: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे.
IND vs SL, Playing 11: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियात ४ बदल निश्चित? अशी असू शकते प्लेइंग ११
team indiatwitter/bcci
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. सुरुवातीचे २ सामने जिंकून भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकून भारतीय संघ श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs SL, Playing 11: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियात ४ बदल निश्चित? अशी असू शकते प्लेइंग ११
IND VS SL: भारत- श्रीलंकेत आज तिसरा टी ट्वेंटी सामना! टीम इंडियाला हॅट्रिकचा चान्स, श्रीलंकेसमोर लाज राखण्याचे आव्हान; कधी अन् कुठे पाहाल मॅच?

भारतीय संघात होऊ शकतात ४ बदल

दुसऱ्या टी -२० सामन्यासाठी शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती. तर त्याच्या जागी संजू सॅमसनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र संजुला या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. या सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. यासह खलिल अहमदचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दोन्ही सामन्यांमध्ये केवळ १ गडी बाद करता आला आहे.

ही मालिका जिंकण्यासाठी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे भारतीय संघ आपल्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यासाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. ज्यात हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश असू शकतो. या दोन्ही खेळाडूंच्या जागी शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

IND vs SL, Playing 11: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियात ४ बदल निश्चित? अशी असू शकते प्लेइंग ११
Paris Olympics 2024: मनू भाकर आणखी एक पदक जिंकून देणार? जाणून घ्या चौथ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing XI)

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, खलील अहमद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com