सलग दोन टी ट्वेंटी सामन्यांमध्ये धुळ चारल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा सामना खेळणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून हॅट्रिक करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे आजच्या सामन्यात विजय मिळवून क्लिन स्वीपची नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान श्रीलंकेच्या संघासमोर असेल.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी सामना खेळत आहे. तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली आहे. आज भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तिसरा सामना होणार असून श्रीलंकेला धुळ चारत हॅट्रिक मारण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पल्लेकेले येथे मंगळवारी संध्याकाळी हलका पाऊस पडू शकतो, जो क्रिकेटप्रेंमीसाठी चिंतेचा विषय असू शकतो. तर तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग 6-7 किमी/तास आणि सरासरी आर्द्रता पातळी सुमारे 85 टक्के अपेक्षित आहे. ही खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी अनुकूल होती. मात्र, पावसामुळे आउटफिल्ड मंद असू शकते. नवीन चेंडू टोलावणे सोपे असेल, पण जसजसा तो जुना होईल तसतशी फलंदाजी अधिक आव्हानात्मक होईल.
आज (मंगळवार, ३० जुलै) पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना होईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. मोबाईल वर सामना पाहणार असाल तर सोनी लिव्ह या एपवरुन पाहता येईल. आणि टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर क्रिकेटप्रेमींना हा सामना पाहता येईल.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रायन पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, शिवम दुबे. शुभमन गिल.
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), दासून शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथिशा पाथिराना, अशिथा फर्नांडो, अविष्का चंदल, दिनेश चंदल वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, दिलशान मदुशंका.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.