आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने इतिहास रचला आहे. वर्ल्डकपमध्ये कोणत्याही संघाला जमला नाही, असा कारनामा पाकिस्तानने करुन दाखवलाय. (Latest Marathi News)
त्यामुळे या विजयाचं मोठं कौतुक केलं जातंय. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर विजयासाठी 345 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली.
सलामीवीर इमाम उल हक् आणि कर्णधार बाबर आझम झटपट माघारी परतले. त्यामुळे पावर प्लेमध्ये पाकिस्तानची स्थिती एकवेळ 2 बाद 37 अशी झाली होती. तेथून पाकिस्तानने विक्रमी विजय साकारला. पाकिस्तानकडून अब्दुल्ला आणि रिझवानने तिसऱ्या विकेटसाठी पावणे दोनशेची भागीदारी केली.
अब्दुल्ला शफिक 113 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला सौद शकीलही 31 धावा करून बाद झाला. मात्र, इफ्तीकार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांनी आणखीन पडझड न होऊन देता पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मोहम्मद रिझवान 131 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे पाकिस्तानने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुमार कामगिरी केल्याने त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 345 धावांचं आव्हान ठेवलं.
श्रीलंकेकडून कुशल मेंडिस 122 धावा आणि समरविक्रमाने 108 धावांची शतकी खेळी केली.
पाकिस्तानकडून हसन अलीने 4 विकेट्स तर रऊफने 2 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेने दिलेलं आव्हान पाकिस्तानने 6 विकेट्स आणि 10 चेंडू राखत पूर्ण केलं.
पाकिस्तानकडून अब्दुला शफीक 113 धावा आणि मोहमद रिझवान नाबाद 131 धावांची शतकी खेळी केली.
श्रीलंकेकडून मधुशंकाने 2 विकेट्स घेतल्या. तर पथिराना आणि तीक्ष्णाने प्रत्येकी 1 गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.