टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी मोठा उलटफेर झाला. यजमान अमेरिकन संघाने पाकिस्तानला पराभूत करून इतिहास रचला. अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला. पहिल्याच सामन्यात दुबळ्या संघाकडून झालेल्या पराभवामुळे बाबर सेनेची पुरती नाचक्की झाली.
या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. डॅलस येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अवघ्या १५९ धावांवर रोखलं. पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली होती.
त्यांनी अवघ्या २६ धावात तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मैदानावर आलेल्या बाबर आझमने सर्वाधिक ४४ धावा ठोकल्या. तर शादाब खानने ४० धावांची खेळी केली. मात्र, त्याने अतिशय संथ गतीने फलंदाजी केली. अमेरिकेकडून Nosthush Kenjige याने ३ विकेट्स घेतल्या.
अमेरिकन फलंदाजांनी १६० धावांचा पाठलाग करताना अतिशय सावधपणे फलंदाजी केली. मात्र, कर्णधार मोनांक पटेलने ५० धावांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये अमेरिकेला विजयासाठी १५ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून हॅरिस राउफ गोलंदाजी करत होता.
नितीश कुमारने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकन फलंदाजांनी मोहम्मद आमिरला १९ धावा कुटल्या. २० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये फक्त १३ धावाच करता आल्या. अखेर अमेरिकने हा सामना ६ धावांनी खिशात घातला. या पराभवामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.