IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली; भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर अवघं २१२ धावांचं आव्हान

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. टीम इंडियाने ४६.२ षटकात सर्व गडी गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २११ धावांचं आव्हान दिलं.
IND vs SA 2nd ODI
IND vs SA 2nd ODISaam tv
Published On

India vs South Africa 2nd ODI:

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांचा मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंट जॉर्जेस पार्क येथे खेळविण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया मोठ्या उत्साहाने मैदानात उतरली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. टीम इंडियाने ४६.२ षटकात सर्व गडी गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २११ धावांचं आव्हान दिलं. (Latest Marathi News)

टीम इंडियाकडून सर्वाधिक ६२ धावा सलामीवीर साई सुदर्शनने केल्या. त्याने ८३ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावला. तर कर्णधार केएल राहुलने ६४ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या. तर तिसऱ्या विकेटसाठी सुदर्शन आणि राहुलने ६८ धावांची भागीदारी रचली.

IND vs SA 2nd ODI
IPL 2024: वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाला नडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना IPL ने केलं मालामाल

रिंकू सिंहने डेब्यू सामन्यात फारशी कमाल केली नाही. रिंकू अवघ्या १७ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंह (१८), संजू सॅमसन (१२)आणि तिलक वर्मा (१०) धावांवर बाद झाला. तर आवेश खान ९ धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड (४), अक्षर पटेल (७) , कुलदीप (१) या तिघांनी दहाचा आकडाही पार केला नाही.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IND vs SA 2nd ODI
Rovman Powell Networth: आयपीएलच्या बोलीने आयुष्य बदललं; वेस्ट इंडिजचा ३० वर्षीय खेळाडू एका झटक्यात झाला कोट्यधीश

भारताने १६९ धावांवर ६ गडी गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या नंद्रे बर्गरने टीम इंडियाचे सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर केशव महाराज आणि लिजादने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर हेंड्रिक्सने एक गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com