

नवी दिल्ली: भारत विरुद्ध पाकिस्तानचा आज दुसरा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. हार्दिक पंड्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. पण, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे आघाडीच्या फळीतील फलंदाज कमकुवत ठरले होते. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय नसीम शाहने केएल राहुलला बोल्ड केले होते.
तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली प्रयत्न करत असल्याचे दिसले. आज सामन्या अगोदर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी त्याला यावळी पाकिस्तानी गोलंदाजीवर प्रश्न विचारले. त्यावर त्याने असं उत्तर दिले की सगळ्यांनाच हसू आले. द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा गंभीर मुद्रेत दिसला आहे. मात्र टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वातील मजेशीर पैलूही पाहायला मिळत आहेत.
दुबईतील सामन्यापूर्वी द्रविडला दोन्ही संघांच्या गोलंदाजीबाबत विचारण्यात आले. तेव्हा तो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही गोष्टीबद्दल बोलला. द्रविड म्हणाला, "मला एक शब्द वापरायचा होता, पण तो वापरू शकत नाही." यानंतर द्रविड स्वतःच हसायला लागला आणि म्हणाला, “माझ्या मनात शब्द आहे, तोंडातून बाहेर पडणार होता, पण ते वापरू शकत नाही. मी जो शब्द बोलायचा प्रयत्न करत आहे तो ४ अक्षरांचा शब्द आहे जो 'S' ने सुरू होतो, पण ते ठीक आहे. आम्ही ग्लॅमरस दिसत नाही, पण आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे डायरेक्ट निकाल देतात. यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
विराट कोहलीने किती धावा केल्या याला महत्त्व नाही. त्याच्या मते, टी-20 क्रिकेटमधील एक छोटी खेळीही सामन्याचा मार्ग बदलू शकते. त्यावेळी ऋषभ पंतबाबत द्रविड म्हणाला की, विकेटकीपर म्हणून तो टीम इंडियाचा पहिला पर्याय नाही. खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेऊन खेळाडूची निवड केली जाईल, असंही राहुल द्रविड यावेळी म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.