

नवी दिल्ली: आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या गट फेरीतील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ रविवारपासून सुपर ४ ला सुरूवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. मागील आठवड्यात दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, यात टीम इंडियाचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. गेल्यावेळी सामना शेवटच्या षटकात संपला होता आता पुन्हा एकदा टीम इंडियाकडून चाहत्यांना तिच अपेक्षा आहे. पण, विजयासाठी टीम इंडियाला चांगला खेळ दाखवावा लागणार आहे.
पॉवरप्लेमध्ये भारताच्या आघाडीच्या (Team India) फलंदाजांची कामगिरी अडचणीची ठरत आहे, गेल्या सामन्यात हाँगकाँगचा १५० हून अधिक धावांनी पराभव करणाऱ्या पाकिस्तानचा सामन्यात भारताला गोलंदाजीत बदल करण्याची गरज वाटत आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या रवींद्र जडेजाचीही टीम इंडियाला उणीव भासणार आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले आहे. तर आजच्या सामन्या अगोदर वेगवान गोलंदाज आवेश खानची तब्येत खराब झाली आहे.
भारतीय संघासाठी (Team India) पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी अडचणीची ठरू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्माने खराब खेळी केली आहे. हाँगकाँगसारख्या कमकुवत संघाविरुद्धही भारतीय संघातील आघाडीच्या फळीने संथ फलंदाजी केली आणि सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.
केएल राहुलने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या, ही त्याची आतापर्यंतची सर्वात संथ खेळी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नसीम शाहच्या पहिल्याच चेंडूवर राहुल बोल्ड झाला. त्यामुळे राहुलवर टीका सुरू आहेत.
पाकिस्तानच्या फलंदाजांनाही पहिल्या १० षटकांमध्ये अधिक धावा कराव्या लागणार आहेत. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी चांगली खेळी केली. याशिवाय दुबईची खेळपट्टी संथ असल्याने फलंदाजांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
टीम पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.