

नवी दिल्ली: टी 20 वर्ल्ड कप सुरू होऊन भारताचे (Team India) दोन सामनेही झाले आहेत, पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध तर दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध झाला. दोन्ही सामन्यात टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. आता टीम इंडियाची वाटचाल T 20 चषकाच्या जवळ पोहोचली आहे. सुपर ४ राऊंडमध्ये टीमने आपले स्थान आता पक्के केले आहे. आता आज पुन्हा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे.
टीम इंडियाने (Team India) दोन्ही सामने जिंकले असले तरी माजी क्रिकेट पट्टुंनी संघाच्या कामगिरीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे, या सामन्यापूर्वी संघाला ५ मुद्द्यावर काम करावे लागणार आहे. हे पाच प्रश्न कर्णधार रोहित शर्मासाठी आहेत.
केएल राहुल संदर्भात हर्ष भोगलेपासून आकाश चोप्रापर्यंत सर्वांनी चिंता व्यक्त केली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करणार्या केएल राहुलने अजुनही खेळी दाखवलेली नाही. केएलने खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये वैयक्तिक एकूण ३६ धावांसह समान धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १८ आणि स्ट्राईकरेट ९०.०० आहे.
कर्णधार रोहित शर्मावरही टीका होत आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहितकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. हाँगकाँगविरुद्ध मोठी खेळी खेळण्याची संधीही त्याने गमावली. आणि आतापर्यंत त्याला दोन्ही सामन्यात केवळ २३ धावा करता आल्या आहेत. रोहितचे पाकिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये रेकॉर्ड खूपच खराब आहे. ९ सामन्यांमध्ये रोहितने १४ पेक्षा कमी सरासरीने केवळ ८२ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने हाँगकाँगविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावून टीकाकारांना उत्तर दिले आहे. दानिश कनेरिया आणि वसीम जाफर कोहली बाबत खूश दिसले नाहीत. कोहलीने अजुनही चांगली खेळी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याचा डाव फसला.
युएईच्या मैदान फिरकीपटूंना अनुकूल आहेत. अफगाणिस्तानचा रशीद आणि मुजीब-उर-रहमान विकेट घेत आहेत, तर चहलने दोन्ही सामन्यात टाकलेल्या आठ षटकांत ५० धावा देऊनही एकही बळी घेतलेला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही टीका होत आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी अर्शदीप सिंगची भारतीय संघात (Team India) निवड स्लॉग ओव्हर्समध्ये धावांवर मर्यादा घालण्यासाठी केली आहे. पण त्याच्याकडून तशी कामगिरी होत नसल्याचे दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हाँगकाँगसारख्या संघाविरुद्ध त्याने ४ षटकात ४४ धावा दिल्या. अर्शदीपने आतापर्यंत ७.५ षटके टाकली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.