नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धा २०२२ मधून नुकताच बाहेर पडलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता टी-२० विश्वचषक स्पर्धेलाही (T-20 world cup) मुकणार आहे. पायाच्या दुखापतीमुळं जडेजाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. डोफ्याला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने जडेजाने विश्रांती घेतली आहे.
रविंद्र जडेजा आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) ग्रुप स्टेजच्या सामन्यात खेळला. पंरतु, दुखापतीमुळं सुपर चारमध्ये होणारे सामने त्याला खेळता येणार नाही. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली होती. जडेजाच्या उजव्या डोफ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर होत आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती. जडेजा आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी फिट होईल आणि पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण आता पुढील विश्वचषकातही तो खेळणार नसल्याने टीम इंडिसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, रविंद्र जडेजाच्या उजव्या पायाच्या डोफ्याला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. जडेजा अनिश्चित काळासाठी क्रिकेटरपासून बाहेर राहणार आहे. जडेजा जवळपास तीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही असं बोललं जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.