Asia Cup 2022 : पाकिस्तानचा हाँगकाँगवर दणदणीत विजय, भारत-पाकिस्तान रविवारी आमने-सामने

आशिया चषक स्पर्धा २०२२ सुरू झाल्यापासून क्रिकेटच्या मैदानात रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत.
India vs Pakistan match on Sunday
India vs Pakistan match on Sundaysaam TV
Published On

दुबई : आशिया चषक स्पर्धा २०२२ (Asia cup 2022) सुरू झाल्यापासून क्रिकेटच्या मैदानात एकाहून एक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. आज पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने एकतर्फी विजय मिळवला. तब्बल १५५ धावांनी मात करून पाकिस्तानने हॉंगकॉंगच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. अवघ्या ३८ धावांवर हॉंगकॉंगच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत-पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. (Asia Cup 2022 latest News Update)

पाकिस्तानने हॉंगकॉंगला १९४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. परंतु, पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढं हॉंगकॉंगच्या खेळाडूंना फक्त ३८ धावा करून माघारी परतावं लागलं. या मोठ्या पराभवामुळं हॉंगकॉंग स्पर्धेतून बाहेर झाली आहे. त्यामुळे रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत-पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. अफगानिस्तान, भारत आणि श्रीलंकेने याआधीच सुपर चार मध्ये प्रवेश केला आहे.

India vs Pakistan match on Sunday
केएल राहुलमध्ये रोहित शर्मापेक्षा अधिक क्षमता, फक्त...; वर्ल्डकप विजेता क्रिकेटपटू काय म्हणाला?

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर हाँगकाँगलाही दुसऱ्या लढतीत हरवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी घोडदौड सुरू असताना आणि महत्वाच्या सुपर फोर फेरीत प्रवेश केलेला असतानाच, टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. त्याच्या जागी ऑलराउंडर अक्षर पटेल याचा संघात समावेश केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com